TRENDING:

Palmistry: कमी वयात पैसा-यश मिळतं! तळहातावर तयार होणारे हे दोन उंचवटे नशिबाचं गुपित

Last Updated:

Palmistry Marathi Tips: हस्तरेषा शास्त्रानुसार हस्तरेषांमध्ये शुक्र आणि गुरु पर्वताचा उदय खूप शुभ मानला जातो. ज्यांच्या तळहातावर हे दोन्ही पर्वत असतात, ते खूप भाग्यवान असतात. त्यांचे जीवन खूप आनंदी असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हस्तरेषाशास्त्र हा ज्योतिषशास्त्रातला एक महत्त्वाचा भाग आहे. हाताच्या रेषांवरून एखाद्या व्यक्तीबद्दल बरेच काही जाणून घेता येते. हस्तरेषा शास्त्राद्वारे, व्यक्तीचे वर्तन, कारकिर्द आणि भविष्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. आपल्या हाताच्या रेषांमध्ये अनेक योग आणि चिन्हे असतात, जी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी संबंधित असतात. हस्तरेषाशास्त्रात या गोष्टींचा उल्लेख आहे.
News18
News18
advertisement

पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, एखाद्या व्यक्तीच्या हातावरील रेषा त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत अनेक रहस्ये प्रकट करते. यावरून ती व्यक्ती किती भाग्यवान आणि श्रीमंत होऊ शकते, हे दिसून येते. जाणून घेऊ हाताच्या रेषांवरून माणसाचा स्वभाव कसा ओळखता येतो.

हस्तरेषा शास्त्रानुसार हस्तरेषांमध्ये शुक्र आणि गुरु पर्वताचा उदय खूप शुभ मानला जातो. ज्यांच्या तळहातावर हे दोन्ही पर्वत असतात, ते खूप भाग्यवान असतात. त्यांचे जीवन खूप आनंदी असते. अशा लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. देवस्थान शुक्र आणि गुरु पर्वताच्या मध्ये असते. असे मानले जाते की, हे ठिकाण जितके खोलगट असेल तितके त्या व्यक्तीचे नशीब चांगले असते.

advertisement

कुठे असतो शुक्र पर्वत - शास्त्रानुसार शुक्र पर्वत मणिबंधाच्यावर आणि अंगठ्याच्या खाली असतो. शुक्र पर्वताची खोली सांगते की, ती व्यक्ती सुखांसाठी अधिक प्रयत्न करतेय. अशा लोकांच्या आयुष्यात संपत्तीची कमतरता नसते. असे लोक सौंदर्य पाहून लवकर आकर्षित होतात.

पहिलं सूर्यग्रहण आणि शनी गोचर एकाच दिवशी! 2025 मध्ये या राशींचा वरचष्मा कायम

advertisement

शुक्र पर्वतावर त्रिकोणी चिन्ह असणे शुभ मानले जाते. अशा लोकांवर देवतांची कृपा कायम राहते. त्यांच्या जीवनात सदैव सुख-समृद्धी नांदत असते.

गुरु पर्वत कोठे असतो- तर्जनीजवळ पसरलेल्या भागाला गुरु पर्वत म्हणतात. गुरू पर्वक जितका स्वच्छ आणि खोलगट असेल तितकेच माणसाचे जीवन भाग्यवान असते. अशा व्यक्ती आपली ठरवलेली ध्येय पूर्ण करत राहते. त्यांना आयुष्यात लवकर यश मिळतं. हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. गुरु पर्वतावर विशेष चिन्ह असणे शुभ असते. जर गुरूच्या पर्वतावर क्रॉसचे चिन्ह असेल तर त्याच्या आयुष्यात नेहमीच प्रेम राहते.

advertisement

इतका त्रास सोसलाय! आता या राशींना लक साथ देणार; मंगळ-गुरूचा वरदहस्त

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Palmistry: कमी वयात पैसा-यश मिळतं! तळहातावर तयार होणारे हे दोन उंचवटे नशिबाचं गुपित
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल