संकष्टीच्या करावे हे उपाय -
चंद्राला जल अर्पण करा - चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला जल अर्पण करा आणि नंतर त्याच पाण्यात थोडी हळद आणि अखंड तांदळाचे दाणे मिसळा. खालील मंत्राचा जप करत रहा. यामुळे मनाला शांती मिळेल आणि नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यासाठीचा मंत्र आहे: "ओम श्री गणेशाय नम:" किंवा "गण गणपतये नम:."
advertisement
मंत्राचा जप करणे - रात्री पूजा करताना, श्री गणेशासमोर बसून मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे व्यवसायात यश मिळू शकते आणि नोकरीशी संबंधित कामे पूर्ण होऊ शकतात. यासाठीचा मंत्र आहे:
"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभा."
संकटनाशन गणेश स्तोत्र - चंद्रोदयाच्या वेळी श्री गणेशाच्या मूर्तीसमोर बसा आणि "संकटनाशन गणेश स्तोत्र" पठण करा. या विधीने गणराया प्रसन्न होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व त्रास दूर होतील. मानसिक ताण कमी होईल, व्यवसायाशी संबंधित कामातही भरभराट होईल.
मोदक आणि दुर्वा अर्पण करा - रात्री चंद्राचे दर्शन घेण्यापूर्वी लाडक्या गणरायासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. गणेशाला 21 जुडी दुर्वा अर्पण करा, मोदक किंवा तीळाचे लाडू अर्पण करा. दुर्वा अर्पण करताना, तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करा. यानं तुमच्या नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर होतील आणि तुमचे पद वाढेल.
भाग्याेदयाची वेळ आता आलीय! 28 नोव्हेंबरपासून 5 राशींना शनीकडून मोलाची साथ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
