महाकुंभ 2025 आकर्षणाचे केंद्र
13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत प्रयागराज येथे आयोजित झालेल्या महाकुंभमेळ्याने जगभरातील भाविकांना आकर्षित केले. 144 वर्षांनंतर येणारा हा विशेष योग असल्याने 66 कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर 'अमृत स्नान' केले. या मेगा इव्हेंटमुळे प्रयागराज हे जगातील सर्वात मोठे तात्पुरते शहर म्हणून ओळखले गेले.
advertisement
'धार्मिक ट्रँगल'ची निर्मिती
उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या, वाराणसी (काशी) आणि प्रयागराज या तीन शहरांना जोडून एक 'धार्मिक ट्रँगल' विकसित केला आहे. राम मंदिर निर्मितीनंतर अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली असून, त्यानंतर भाविक वाराणसी आणि प्रयागराजला पसंती देत आहेत. या तिन्ही शहरांच्या कनेक्टिव्हिटीमुळे पर्यटकांचा ओघ सातत्याने वाढत आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी
प्रयागराज विमानतळाचा विस्तार, नवीन टर्मिनल आणि शहरातील 4-लेन रस्ते यामुळे प्रवास सुलभ झाला आहे. महाकुंभ दरम्यान 750 हून अधिक शटल बसेस दर 2 मिनिटांनी धावत होत्या, तर रेल्वेने 500 हून अधिक विशेष गाड्या सोडल्या होत्या. या उत्तम नियोजनामुळे पर्यटकांनी उत्तर प्रदेशला पहिली पसंती दिली.
विदेशी पर्यटकांचा विक्रम
पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, महाकुंभ 2025 दरम्यान तब्बल 55 लाख विदेशी पर्यटकांनी उत्तर प्रदेशला भेट दिली. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही संख्या विक्रमी आहे. अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि नेपाळ यांसारख्या 100 हून अधिक देशांतील नागरिक कुंभमेळ्यासाठी दाखल झाले होते, ज्याचा मोठा फायदा राज्याच्या जीडीपीला झाला.
आर्थिक सुबत्ता आणि रोजगार
महाकुंभामुळे उत्तर प्रदेशमध्ये सुमारे 25,000 कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याचा अंदाज आहे. हॉटेल, ट्रान्सपोर्ट आणि स्थानिक हस्तशिल्प व्यवसायांना यामुळे मोठी उभारी मिळाली. टेंट सिटीच्या माध्यमातूनच पर्यटन महामंडळाने 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. केवळ धार्मिकच नव्हे, तर 'स्वदेश दर्शन 2.0' योजनेअंतर्गत नैमिषारण्य आणि चित्रकूट यांसारख्या पौराणिक स्थळांचा विकास केल्याने उत्तर प्रदेश आता केवळ तीर्थयात्रेसाठीच नाही, तर 'कल्चरल टुरिझम'साठी सुद्धा नंबर 1 बनले आहे.
