TRENDING:

Vastu Niyam: कारच्या डॅशबोर्डवर देवतांच्या मूर्ती लावणाऱ्यांना हे नियम माहीत हवेत; वेळीच करून घ्या..

Last Updated:

Vastu Niyam: वास्तू शास्त्रानुसार, ध्यानात बसलेली मूर्ती मग ती गणपतीची असो, महादेवाची असो किंवा इतर कोणत्याही देवी-देवतांची, ती कारमध्ये ठेवू नये. ध्यान मुद्रा ही शांतता, स्थिरता आणि आत्मचिंतनाचे प्रतीक असते, तर कार हे एक गतिशील ठिकाण आहे. अशा मूर्तींचा प्रभाव..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजकाल कित्येक लोक आपल्या कारमध्ये खासकरून डॅशबोर्डवर देवाच्या मूर्ती किंवा फोटो बसवतात. यामुळे प्रवास सुरक्षित राहतो आणि नकारात्मक गोष्टी घडत नाहीत, अशी धार्मिक श्रद्धा आहे. विशेषतः गणपती, महादेव किंवा इतर देवी-देवतांच्या मूर्ती डॅशबोर्डवर लावणे लोकांना आवडते. पण, कारमध्ये प्रत्येक प्रकारची मूर्ती किंवा फोटो ठेवणे योग्य नसते? वास्तूशास्त्र आणि तज्ज्ञांच्या मते, चुकीच्या मुद्रेतील मूर्ती लक्ष विचलित करण्यासोबतच ड्रायव्हिंग दरम्यान धोकाही वाढवू शकते.
News18
News18
advertisement

ध्यान मुद्रा असलेल्या मूर्ती का ठेवू नयेत?

वास्तू शास्त्रानुसार, ध्यानात बसलेली मूर्ती मग ती गणपतीची असो, महादेवाची असो किंवा इतर कोणत्याही देवी-देवतांची, ती कारमध्ये ठेवू नये. ध्यान मुद्रा ही शांतता, स्थिरता आणि आत्मचिंतनाचे प्रतीक असते, तर कार हे एक गतिशील ठिकाण आहे. अशा मूर्तींचा प्रभाव ड्रायव्हरच्या मनावर पडू शकतो, ज्यामुळे एकाग्रता कमी होण्याची आणि मन भरकटण्याची शक्यता असते. याच कारणामुळे तज्ज्ञ कारमध्ये ध्यान मुद्रेतील मूर्ती किंवा फोटो लावण्यास मनाई करतात. विशेषतः गणपतीचा ध्यान मुद्रेतील फोटो किंवा मूर्ती लावणे टाळावे. जरी गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते, तरीही त्यांची जागृत किंवा आशीर्वाद मुद्राच वाहनासाठी शुभ मानली जाते.

advertisement

कारमध्ये कोणती मूर्ती किंवा फोटो लावणे शुभ -

कारमध्ये अशी मूर्ती किंवा फोटो लावावा ज्यामध्ये देवाचे डोळे उघडे असतील आणि मुद्रा जागृत अवस्थेतील असेल. जागृत मुद्रा ही सकारात्मक ऊर्जा, सतर्कता आणि सुरक्षेचे प्रतीक मानली जाते. गणपतीची आशीर्वाद देणारी मुद्रा किंवा शंकराचा शांत पण जागृत फोटो वाहनासाठी उत्तम मानला जातो.

कारमध्ये मूर्ती लावण्याचे काही नियम - तुम्हाला कारमध्ये देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा असेल, तर काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. मूर्ती किंवा फोटो डॅशबोर्डच्या मध्यभागी अशा ठिकाणी ठेवा, जिथे ड्रायव्हिंग करताना तुमची नजर वारंवार त्यावर जाणार नाही आणि लक्ष विचलित होणार नाही. मूर्ती लावण्यापूर्वी तिची विधिवत पूजा करा आणि गंगाजलाने शुद्ध करा.

advertisement

एकामागून एक अडचणी आता पिच्छा सोडणार; शनिचा नक्षत्र बदल 3 राशींना लकी, खुशखबर

कारमध्ये कधीही खंडित किंवा तुटलेली मूर्ती ठेवू नका, कारण ते अशुभ मानले जाते. मूर्तीवर फुले, हार किंवा इतर सजावटीचे साहित्य अर्पण करू नका, कारण यामुळे ड्रायव्हिंगमध्ये अडथळा येऊ शकतो. दररोज किंवा वेळोवेळी मूर्तीची साफसफाई नक्की करा, जेणेकरून त्यावर धूळ किंवा घाण साचणार नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीचा नाद सोडला, इंजिनिअर तरुणानं लावलं डोकं, खेकडा शेतीतून लाखोंची कमाई, Vide
सर्व पहा

योग्य मूर्ती ठेवण्याचे फायदे - वास्तू मान्यतेनुसार, कारमध्ये योग्य प्रकारची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने अपघातांची शक्यता कमी होते. ड्रायव्हिंग करताना मन शांत आणि केंद्रित राहते. गणपती किंवा महादेवाची जागृत मुद्रा असलेली मूर्ती प्रवासातील विघ्न दूर करण्यास मदत करते.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Niyam: कारच्या डॅशबोर्डवर देवतांच्या मूर्ती लावणाऱ्यांना हे नियम माहीत हवेत; वेळीच करून घ्या..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल