दक्षिण दिशेला लावा - वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला काही रोपे लावणे खूप शुभ मानले जाते. कडुलिंब, चमेली, कोरफड, मनी प्लांट यांसारखी झाडे दक्षिण दिशेला लावावीत. दक्षिण दिशेला ही रोपे लावल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि आर्थिक लाभही होतो. या वनस्पतींच्या प्रभावामुळे कुटुंबात सुसंवाद राखला जातो.
सोने आणि चांदी - वास्तुशास्त्रानुसार, घराच्या दक्षिण दिशेला सोने आणि चांदी ठेवणे देखील शुभ मानले जाते. दक्षिण दिशेला मौल्यवान दागिने ठेवल्याने उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतात आणि आपले उत्पन्नही वाढू शकते. कोणतीही मौल्यवान वस्तू दक्षिण दिशेला ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.
advertisement
झाडू ठेवल्याने - झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. झाडू घराच्या दक्षिण दिशेला ठेवला तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबाला धन आणि समृद्धीने समृद्ध करते. पण, दोन झाडू एकत्र ठेवू नयेत. झाडू बाहेरून येणाऱ्यांच्या नजरेस येईल असा ठेवू नये. अशाप्रकारे, झाडू दक्षिण दिशेला ठेवल्याने आर्थिक समस्या आणि पैशाशी संबंधित इतर समस्या दूर होतील.
प्रगतीपथावर! या राशींना कुठून कसे सापडू लागतील मार्ग; नव्या नोकरीने चिंता मिटणार
या गोष्टी लक्षात ठेवा - वास्तुशास्त्रानुसार, पलंगाचा डोक्याकडील भाग म्हणजेच डोके ठेवण्याची जागा दक्षिणेकडे असावी. यामुळे नकारात्मक उर्जेचा तुमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे मानले जाते. घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर त्यावर स्वस्तिक चिन्ह काढावे. असे केल्याने दुर्दैव दूर होते. याशिवाय, दक्षिणेला असलेल्या दारावर पंचमुखी हनुमान किंवा श्री गणेशाची मूर्ती ठेवूनही ते शुभ बनवता येते.
राशी बदलून शनिचा उदय! या राशींच्या खूप काही पथ्यावर पडणार, भाग्य उजळण्याचे योग
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)