घरात वास्तुशास्त्राचे नियम पाळले तर यश नक्कीच मिळते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार डॉ. अरविंद पचौरी यांच्याकडून जाणून घेऊया, दैनंदिन जीवनात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, ज्यामुळे आर्थिक संकट येऊ शकते.
दारात अंधार असू नये: घराचा मुख्य दरवाजा कधीही अंधारात ठेवू नका. मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असणे अशुभ मानले जाते. असे केल्याने महत्त्वाच्या कामात अडथळा येतो आणि काम बिघडते.
advertisement
घर व्यवस्थित ठेवा: जो व्यक्ती घरातील वस्तू व्यवस्थित ठेवत नाही त्याच्यावर देवी लक्ष्मी कोपते. घरात वस्तू विसकळीत असल्यानं देवी लक्ष्मी रुष्ट होते आणि आर्थिक संकट येते, असे मानले जाते.
मेषमागे साडेसाती, मिथुनचा भाग्योदय, तुमच्यासाठी राशीसाठी कशी असेल शनिची चाल?
अंथरुणावर बसून खाणे: बेडवर (अंथरुणावर) बसून कधीही जेवू नये. असे केल्याने माता अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मी रुष्ट होतात आणि घरातून निघून जातात. त्यामुळे पैशाची समस्या निर्माण होते.
तुटलेली काचेची वस्तू: घरात कधीही तुटलेली काचेची वस्तू ठेवू नका. तुटलेली काच नकारात्मक ऊर्जा आणते आणि घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करते.
रात्री परफ्यूम वापरू नका: वास्तुशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे रात्री परफ्यूम वापरू नये. यामुळे नकारात्मकता आकर्षित होते आणि समस्यांना तोंड द्यावे लागते.
Shree Hanuman Chalisa: हनुमान चालीसा- जय हनुमान ज्ञान गुन सागर।
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)