TRENDING:

नवीन वर्षात नेमकं काय घडणार? अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज की ब्रेकअप, 2026 'या' मूलांकासाठी ठरणार खास!

Last Updated:

अंकशास्त्रानुसार, 2026 या वर्षाची एकूण बेरीज 1 येते, ज्याचा स्वामी 'सूर्य' आहे. सूर्य हा आत्मविश्वास आणि नवीन सुरुवातीचा कारक आहे. त्यामुळे हे वर्ष नात्यांमधील स्पष्टता आणि नवीन वळणांचे वर्ष असेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवीन वर्ष 2026 लवकरच सुरू होत आहे आणि प्रत्येकाच्या मनात कुतूहल आहे की हे वर्ष त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी कसे असेल. अंकशास्त्रानुसार, 2026 या वर्षाची एकूण बेरीज 1 येते, ज्याचा स्वामी 'सूर्य' आहे. सूर्य हा आत्मविश्वास आणि नवीन सुरुवातीचा कारक आहे. त्यामुळे हे वर्ष नात्यांमधील स्पष्टता आणि नवीन वळणांचे वर्ष असेल.
News18
News18
advertisement

मूलांक 1 (जन्मतारीख 1, 10, 19, 28): सूर्याचे वर्ष असल्याने तुमच्यासाठी हे वर्ष प्रगतीचे आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर तुमचे रूपांतर विवाहात होण्याची दाट शक्यता आहे. प्रबळ आत्मविश्वासामुळे तुम्ही घरातील लोकांना लग्नासाठी राजी करू शकाल.

मूलांक 2 (जन्मतारीख 2, 11, 20, 29): हे वर्ष तुमच्यासाठी भावनिक असेल. अविवाहितांसाठी अरेंज मॅरेजचे उत्तम योग जुळून येत आहेत. नात्यात थोडे चढ-उतार येऊ शकतात, पण जोडीदाराच्या मदतीने तुम्ही त्यावर मात कराल.

advertisement

मूलांक 3 (जन्मतारीख 3, 12, 21, 30): मूलांक 3 साठी 2026 हे वर्ष प्रेम विवाहासाठी अत्यंत शुभ आहे. तुमचे ज्ञान आणि समजूतदारपणा यामुळे जुन्या समस्या मिटतील. वर्षाच्या मध्यात लग्नाचे योग प्रबळ आहेत.

मूलांक 4 (जन्मतारीख 4, 13, 22, 31): मूलांक 4 च्या व्यक्तींनी यावर्षी नात्यात सावध राहावे. गैरसमजामुळे ब्रेकअप किंवा वाद होण्याची शक्यता आहे. संयम ठेवा आणि जोडीदारावर संशय घेणे टाळा.

advertisement

मूलांक 5 (जन्मतारीख 5, 14, 23): तुम्ही स्वभावाने चंचल आहात, पण 2026 मध्ये तुम्हाला तुमचा 'सोलमेट' मिळू शकतो. जे लोक सिंगल आहेत, त्यांच्या आयुष्यात नवीन प्रेम येईल. सामाजिक कार्यक्रमातून विवाहाचे प्रस्ताव येतील.

मूलांक 6 (जन्मतारीख 6, 15, 24): अंकशास्त्रानुसार 6 हा अंक प्रेमाचा कारक आहे. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी विवाह आणि रोमँटिक प्रवासाचे वर्ष आहे. लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हे वर्ष 'लकी' ठरेल.

advertisement

मूलांक 7 (जन्मतारीख 7, 16, 25): मूलांक 7 साठी हे वर्ष आत्मचिंतनाचे आहे. नात्यात थोडे अंतर किंवा डिटॅचमेंट जाणवू शकते. घाईघाईत लग्नाचा निर्णय घेऊ नका, आधी एकमेकांना समजून घ्या.

मूलांक 8 (जन्मतारीख 8, 17, 26): तुमच्यासाठी हे वर्ष स्थिरतेचे आहे. नात्यातील गांभीर्य वाढेल. जे लोक बऱ्याच काळापासून लग्नासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांचे कार्य २०२६ च्या शेवटी यशस्वी होईल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थंडीच्या दिवसांत खायला गरम, तुरीच्या दाण्याची खुसखुशीत कचोरी, रेसिपीचा Video
सर्व पहा

मूलांक 9 (जन्मतारीख 9, 18, 27): नात्यात थोडा उग्रपणा किंवा अहंकार येऊ शकतो, ज्यामुळे वाद होतील. मात्र, जर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवले, तर प्रेम विवाहात यश मिळेल. वर्षाचा उत्तरार्ध विवाहासाठी अधिक अनुकूल आहे.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
नवीन वर्षात नेमकं काय घडणार? अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज की ब्रेकअप, 2026 'या' मूलांकासाठी ठरणार खास!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल