TRENDING:

थंडीच्या दिवसांत खायला गरम गरम, ओल्या तुरीच्या दाण्याची खुसखुशीत कचोरी, रेसिपीचा Video

Last Updated:

सध्या मार्केटमध्ये ओले तुरीचे दाणे उपलब्ध आहेत. त्यापासून विविध पदार्थ तयार होतात. त्यातीलच एक म्हणजे तुरीच्या दाण्याची कचोरी. ही कचोरी बनवायला थोडी किचकट पण खायला अतिशय टेस्टी लागते. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : सध्या मार्केटमध्ये ओले तुरीचे दाणे उपलब्ध आहेत. त्यापासून विविध पदार्थ तयार होतात. त्यातीलच एक म्हणजे तुरीच्या दाण्याची कचोरी. ही कचोरी बनवायला थोडी किचकट पण खायला अतिशय टेस्टी लागते. काही टिप्स फॉलो केल्यास ही कचोरी अतिशय खुसखुशीत तयार होते. जाणून घेऊ रेसिपी.
advertisement

ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी बनविण्यासाठी लागणारे साहित्य

1 वाटी तुरीचे दाणे, 2 वाटी मैदा, 1/2 वाटी भाजलेलं बेसन पीठ, 1/2 वाटी तेल, जिरे, बडीसोप आणि धने भाजून आणि बारीक करून घेतलेलं पावडर, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचा ठेचा, जिरे, मोहरी, कडीपत्ता, कोथिंबीर, आमचूर पावडर, हळद, मीठ आणि मसाला हे साहित्य लागेल.

advertisement

Strawberry Jam Recipe : घरातील सगळेच खातील आवडीने, हिवाळ्यात बनवा स्ट्रॉबेरी जॅम, रेसिपीचा संपूर्ण Video

कचोरी बनविण्याची कृती

सर्वात आधी मैदा भिजवून घ्यायचा आहे. मैदा भिजवण्याआधी त्यात अर्धी वाटी पेक्षा थोडं कमी तेल टाकून घ्यायचं आहे. त्यासाठी थंड तेल वापरायचं आहे. तेलात मैदा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. गोळा तयार होईपर्यंत मैदा तेलात मिक्स करायचा आहे. नंतर मैदा भिजवून घ्यायचा आहे. त्यात मीठ टाकायचे नाही. किंवा चवीसाठी अगदी कमी मीठ तुम्ही यात टाकू शकता. मीठ टाकल्याने कचोरी खुसखुशीत होत नाही. भिजवून घेतल्यानंतर मैदा अर्धा तास असाच झाकून ठेवायचा आहे. तोपर्यंत कचोरीमधील सारण तयार करून घ्या.

advertisement

त्यासाठी सर्वात आधी तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत. त्या दाण्याचा कच्चेपणा निघेपर्यंत दाणे भाजून घेतले की, आता दाणे थंड करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. दाणे बारीक करून झाले की, कढईत तेल टाकून घ्या. तेल थोडं गरम झालं की, त्यात जिरे आणि मोहरी टाकून घ्या. त्यानंतर कडीपत्ता टाकून घ्या. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट टाकून घ्या. ही पेस्ट व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. नंतर त्यात जिरे, धने आणि बडीशोपची पूड टाकून घ्या. ते सुद्धा परतवून घ्या. नंतर मसाले टाकून आणि त्यानंतर लगेच कोथिंबीर टाकून घ्या. आता हे मिश्रण आणखी 2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे.

advertisement

त्यानंतर त्यात बारीक करून घेतलेले दाणे टाकून घ्या. ते दाणे मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करून घेतल्यानंतर यात बेसन पीठ टाकून घ्या. बेसन टाकून घेतल्यानंतर हे मिश्रण मिक्स करून 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटांनंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण थंड झाले की, आता त्याचे छोटे गोळे तयार करून घ्या. एकाच आकाराचे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत. अशाप्रकारे सर्व गोळे तयार करून घ्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गावची कारभारी, MPSC शिकणारी! स्नेहल बनली नगरसेविका; अशी जिंकली निवडणूक!
सर्व पहा

नंतर कचोरी भरून घ्यायची आहे. त्यासाठी भिजवलेला मैदा घ्यायचा आहे. सारण आणि मैदा यात दाखविल्याप्रमाणे फरक असायला पाहिजे. म्हणजे मैदा हा सारणाच्या दुप्पट असायला पाहिजे. नंतर पाती तयार करून घ्या आणि त्यात सारण टाकून घ्या. सारण टाकून घेतल्यानंतर आता कचोरी बांधायची आहे. मोदक जसा जमा करून तयार करतो, तशीच कचोरी करायची आहे. त्यानंतर ती थोडी लाटून घ्यायची आहे. नंतर ही कचोरी कमी ते मध्यम आचेवर गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. अशाप्रकारे कचोरी तयार झाली असेल. ही कचोरी तळलेली हिरवी मिरची आणि टोमॅटो केचप सोबत खूप टेस्टी लागते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
थंडीच्या दिवसांत खायला गरम गरम, ओल्या तुरीच्या दाण्याची खुसखुशीत कचोरी, रेसिपीचा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल