advertisement

आरोग्यासाठी फायदेशीर, जेवणाचीही वाढेल चवं, सोप्या पद्धतीने बनवा बीट कोशिंबीर, Video

Last Updated:

जेवणाची चव वाढवणारी कोशिंबीर अनेकांच्या आवडीचा पदार्थ असतो. आज आपण बीटापासून तयार केली जाणारी एक खास कोशिंबीर पाहणार आहोत.

+
जेवणाची

जेवणाची चव वाढवणारी सोपी आणि पौष्टिक बीट कोशिंबीर रेसिपी 

पुणे : कोशिंबीर हा महाराष्ट्रीयन जेवणातील एक महत्त्वाचा आणि पौष्टिक पदार्थ आहे. जेवणाची चव वाढवणारी कोशिंबीर अनेकांच्या आवडीचा पदार्थ असतो. आज आपण बीटापासून तयार केली जाणारी एक खास कोशिंबीर पाहणार आहोत. बीट हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असून रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते.  ही रेसिपी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय फायदेशीर आहे. तसेच अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनली जाते. आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या बीटापासून तयार होणारी रुचकर कोशिंबीर वसुंधरा पाटुकले यांनी बनवून दाखवली आहे.
बीटापासून तयार होणारी कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य
बीट, तेल, मोहरी, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता, साखर, शेंगदाणा, कोथिंबीर, मीठ चवीनुसार हे साहित्य लागेल.
कोशिंबीर कृती
सुरुवातीला बीट स्वच्छ धुवून त्याचा देठाकडील भाग कापून घ्या. त्यानंतर बीटाची साल काढून बारीक जाळीच्या किसणीने किसून घ्यावी. किसल्यानंतर त्यातील पाणी नीट पिळून काढून किस मोकळा करून घ्या. आता फोडणी करून घ्या. एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून फोडणी द्यावी.
advertisement
फोडणी पूर्णपणे थंड होऊ द्या. यानंतर बीटाच्या किसामध्ये मीठ, साखर आणि शेंगदाण्याचा कूट घालून चांगले मिक्स करावे. थोडी कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करावे. त्यात दोन टेबलस्पून सायीचे दही घालून एकजीव करावे. शेवटी गार झालेली फोडणी घालून हलक्या हाताने मिक्स करावे. वरून कोथिंबीर घालून सजवावे. ही बीट कोशिंबीर तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता किंवा नुसती खायला देखील ही चविष्ट लागते.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
आरोग्यासाठी फायदेशीर, जेवणाचीही वाढेल चवं, सोप्या पद्धतीने बनवा बीट कोशिंबीर, Video
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement