वयातील जास्त अंतर नात्यासाठी धोकादायक?
चाणक्य यांच्या मते, पती-पत्नीमधील वयातील फरक खूप जास्त नसावा. लग्न हा मानसिक, भावनिक आणि शारीरिक संतुलनाचा विषय आहे आणि वयातील मोठा फरक हा समतोल कमकुवत करू शकतो. अशा वेळेस कुटुंबात आणि त्या नात्यात अनेक चढउतार पाहायला मिळतात. वयातील जास्त अंतर कधीकधी घरातील कलहाचे कारण ठरू शकते.
advertisement
एक तरुण मुलगी आणि वयाने खूप मोठ्या पुरुषाने लग्न का करू नये?
चाणक्य म्हणतात की वयातील मोठे अंतर वैवाहिक जीवनाला अस्थिर बनवते. कारण आवडी, ऊर्जा पातळी आणि जीवनशैलीमध्ये लक्षणीय फरक असतात, ज्यामुळे कालांतराने सुसंगतता कमी होऊ शकते. वयातील अंतर हे बहुतेकदा गोष्टी समजण्यास कारणीभूत ठरते त्यामुळे अशा वयातील अंतर असलेल्या जोडप्यात बऱ्याचदा भांडणं पाहायला मिळतात.
वयातील मोठा फरक मानसिकतेतही फरक निर्माण करतो
तरुण व्यक्ती उत्साह आणि नवीन अनुभवांकडे आकर्षित होते, तर मोठी व्यक्ती स्थिरता आणि परंपरांकडे झुकते. हा फरक नात्यात असंतुलन आणि संघर्ष निर्माण करू शकतो.
नवरा-बायकोच्या वयातील आदर्श अंतर : 3 ते 5 वर्षे
चाणक्य नीतिनुसार, पती-पत्नीमधील आदर्श वयाचा फरक 3-5 वर्षांचा असावा. या फरकामुळे विचार, ऊर्जा किंवा जीवनशैलीत फारसा फरक पडत नाही. यामुळे नाते मजबूत होते. जरी आजकाल अनेक यशस्वी नातेसंबंधांमध्ये वयाचा मोठा फरक दिसून येतो, तरीही चाणक्याचे तत्व असे सूचित करते की संतुलित वैवाहिक जीवनासाठी वयाचा फरक लक्षात ठेवणे शहाणपणाचे आहे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
