पती-पत्नीचा फोटो कोठे लावणे शुभ - वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला म्हणजेच नैऋत्य कोनात पती-पत्नीचा फोटो लावणे सर्वोत्तम मानले जाते. या दिशेला लावलेला फोटो वैवाहिक जीवनात स्थिरता आणतो आणि पती-पत्नीमध्ये प्रेम आणि सामंजस्य वाढवण्यास मदत करतो. याशिवाय घराची उत्तर दिशा देखील जोडीदाराचा फोटो लावण्यासाठी शुभ मानली जाते. यामुळे नात्यात ओलावा राहतो आणि एकमेकांबद्दलचा विश्वास वाढतो. जर तुम्हाला असा फोटो दिवाणखान्यात म्हणजेच ड्रॉइंग रूममध्ये लावायचा असेल, तर तिथेही या दिशांना चालेल.
advertisement
फोटो कोणत्या ठिकाणी लावू नये - वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीचा फोटो कधीही बेडरुमच्या समोरच्या भिंतीवर लावू नये, कारण यामुळे नात्यात मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते. तसेच जोडप्याचे फोटो कधीही घरातील देव्हाऱ्याच्या समोर, बाथरुमच्या भिंतीवर किंवा बाथरुमच्या दरवाजाजवळ लावू नयेत. अशा ठिकाणी फोटो लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि रिलेशनमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.
सूर्य ग्रहणानंतर आता लगेच चंद्रग्रहण, भारतात दिसणार? 3 राशींचे नशीब पुन्हा जोमात
फोटोशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी - वास्तुच्या नियमांनुसार घरात एकाच ठिकाणी खूप सारे फोटो एकत्र करून लावू नयेत, असे करणे अशुभ मानले जाते. बेडरुम किंवा ड्रॉइंग रूममध्ये पती-पत्नीचा एकच पण सुंदर आणि हसमुख फोटो लावावा. फोटोमध्ये जोडपे आनंदी दिसत असेल तर जीवनातही आनंद टिकून राहतो. फोटोची फ्रेम तुटलेली नसावी किंवा तिचा रंग उडालेला नसावा, कारण यामुळे नकारात्मकता येते आणि नाते खराब होऊ शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पती-पत्नीच्या फोटोंसोबत कधीही पूर्वजांचे फोटो लावू नका, यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी-कलह निर्माण होऊ शकतो.
