जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दाट छाये भोवतालच्या विरळ छायेत येतो, तेव्हा ‘छायाकल्प चंद्रग्रहण‘ दिसते. जेव्हा चंद्राचा थोडा भाग पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येतो, तेव्हा ‘खंडग्रास चंद्रग्रहण‘ दिसते. जेव्हा संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येते तेव्हा ‘खग्रास चंद्रग्रहण‘ दिसते. चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण हे नैसर्गिक आविष्कार आहेत. कोणत्याही अंधश्रद्धांना अजिबात घाबरू नका. ग्रहणाचे योग्य प्रकारे निरिक्षण करा. त्यामागचे विज्ञान समजून घ्या. ग्रहणात हवा दूषित होत नाही, असेही ते म्हणाले.
advertisement
इथून पुढे 2034 सालापर्यंत होणारी चंद्रग्रहणे -
(1)खग्रास चंद्रग्रहण - 3 मार्च 2026 - भारतात ग्रहणातच चंद्र उगवेल.
(2)खंडग्रास चंद्रग्रहण - 28 ॲागस्ट 2026 - भारतातून दिसणार नाही.
(3)छायाकल्प चंद्रग्रहण - 20 फेब्रुवारी 2027 - भारतातून दिसेल.
(4)छायाकल्प चंद्रग्रहण - 18 जुलै 2027 - भारतातून दिसेल.
(5)छायाकल्प चंद्रग्रहण - 17 ॲागस्ट 2027 - भारतातून दिसणार नाही.
(6)खंडग्रास चंद्रग्रहण - 12 जानेवारी 2028 - भारतातून दिसणार नाही.
(7)खंडग्रास चंद्रग्रहण - 6 जुलै 2028 - भारतातून दिसेल.
(8) खग्रास चंद्रग्रहण - 31 डिसेंबर 2028 - भारतातून दिसेल.
(9)खग्रास चंद्रग्रहण - 28 जून 2029 - भारतातून दिसणार नाही.
(10)खग्रास चंद्रग्रहण - 20 डिसेंबर 2029 - भारतातून दिसेल.
(11)खंडग्रास चंद्रग्रहण - 15 जून 2030 - भारतातून दिसेल.
(12)छायाकल्प चंद्रग्रहण - 9 डिसेंबर 2030 - भारतातून दिसेल.
(13)छायाकल्प चंद्रग्रहण - 7 मे 2031 - भारतातून दिसणार नाही.
(14)छायाकल्प चंद्रग्रहण - 5 जून 2031 - भारतातून दिसणार नाही.
(15)छायाकल्प चंद्रग्रहण - 30 ॲाक्टोबर 2031 - भारतातून दिसणार नाही.
(16)खग्रास चंद्रग्रहण - 25 एप्रिल 2032 - भारतातून दिसेल.
(17)खग्रास चंद्रग्रहण - 18 ॲाक्टोबर 2032 - भारतातून दिसेल.
(18)खग्रास चंद्रग्रहण - 14 एप्रिल 2033 - भारतातून दिसेल.
(19)खग्रास चंद्रग्रहण - 8 ॲाक्टोबर 2033 - भारतातून दिसेल.
(20) छायाकल्प चंद्रग्रहण- 3 एप्रिल 2034 - भारतातून दिसेल.
