शुक्राच्या ऊर्जेचा ऱ्हास: शुक्र हा ग्रहांमध्ये सर्वात तेजस्वी मानला जातो. पांढरा किंवा चमकदार रंग शुक्राची ऊर्जा वाढवतो. शुक्रवारी हिरवा किंवा गडद रंगाचे कपडे घातल्याने शुक्राची ही शुभ ऊर्जा दबली जाते, ज्यामुळे व्यक्तीच्या आकर्षण शक्तीवर आणि व्यक्तिमत्वावर परिणाम होऊ शकतो.
आर्थिक प्रगतीत अडथळे: शुक्र हा धन आणि समृद्धीचा कारक आहे. ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमकुवत आहे, त्यांनी शुक्रवारी हिरवा रंग वापरल्यास विनाकारण खर्च वाढू शकतात किंवा हातात आलेले पैसे खर्च होण्याची शक्यता असते. महालक्ष्मीच्या उपासनेतही पांढऱ्या आणि गुलाबी रंगाला प्राधान्य दिले जाते.
advertisement
नातेसंबंधांवर परिणाम: शुक्र वैवाहिक सुखाचा स्वामी आहे. शुक्रवारी हिरव्या रंगाच्या गडद छटा वापरल्याने जोडीदारासोबत वैचारिक मतभेद किंवा विनाकारण वाद निर्माण होऊ शकतात, असा ज्योतिषशास्त्रीय संकेत आहे.
'या' राशींवर होतो नकारात्मक प्रभाव: विशेषतः मेष, वृश्चिक आणि सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्रवारी हिरवा रंग वापरणे फारसे हिताचे मानले जात नाही. या राशींच्या व्यक्तींसाठी शुक्र हा तटस्थ किंवा मारक ठरत असेल, तर हिरव्या रंगाचा वापर त्यांच्या मानसिक शांततेत बाधा आणू शकतो.
व्यवसायातील निर्णय: जर तुम्ही शुक्रवारी एखादा मोठा लक्झरी व्यवहार किंवा खरेदी करणार असाल, तर हिरव्या रंगाऐवजी पांढऱ्या रंगाचा वापर करणे जास्त श्रेयस्कर ठरते. हिरवा रंग बुधाचा असल्याने तो व्यवहारात 'अति-विचार' किंवा 'द्विधा मनस्थिती' निर्माण करू शकतो.
कोणते रंग वापरावेत?: शुक्रवारी स्वतःला प्रसन्न आणि भाग्यवान ठेवण्यासाठी पांढरा, ऑफ-व्हाईट, चंदेरी, फिक्कट गुलाबी किंवा चमकदार निळा रंगाचे कपडे परिधान करावेत. हे रंग शुक्राला बलवान करतात, ज्यामुळे समाजात मान-सन्मान वाढतो.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
