बाइक घेतल्यावर पहिल्या काही दिवसांमध्ये इंजिनच्या आतील पार्ट्स आपसात घर्षण होऊन फिट होतात. यामुळे योग्य सर्व्हिस खुप गरजेची असते. पहिली सर्व्हिसिंग दरम्यान इंजिन ऑइल बदललं जातं. ज्यामुळे आत जमा झालेले लहान-लहान कण हे बाहेर पडतात. हे कण इंजिनमध्ये राहिले तर पुढे जाऊन तुम्हाला नुकसान होऊ शकते. यामुळेच योग्य वेळी सर्व्हिसिंग करणए बाइकच्या लाँग लाइफसाठी खुप गरेजेच असते.
advertisement
सर्व्हिसिंग न केल्यास काय होतं?
तुम्ही बाइकची पहिली सर्व्हिसिंग केली नाही तर याचा थेट परिणाम बाइकच्या परफॉर्मेंसवर पडतो. इंजिन लवकर गरम होऊ शकतं आणि त्याची ताकदही कमी होऊ शकते. यासोबतच मायलेजही कमी होते. ज्यामुळे तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात. चेन, ब्रेक आणि क्लच सारखे गरजेचे पार्ट्स योग्य प्रकारे काम करू शकत नाही. हळुहळू लहान अडचणी मोठ्या होतात आणि तुम्हाला रिपेयरिंगला जास्त पैसे खर्च करावे लागतात. अेकदा इंजिनही लवकर खराब होतं.
'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त सनरुफ कार! किंमत फक्त 6.99 लाख रुपयांपासून सुरू
पहिल्या सर्व्हिसिंगमध्ये काय-काय चेक करतात?
पहिल्या सर्व्हिसिंग दरम्यान बाइकचे गरजेच्या भागांची टेस्ट केली जाते. यात इंजिन ऑइल बदलणे, ब्रेक तपासणे, चेन टाइट करणे आणि टायर प्रेशर पाहिलं जातं. यासोबतच बाईकचे सर्व नट-बोल्ट चेक केले जातात. जेणेकरुन काहीच लूज राहू नये. यामुळे बाइक स्मूद चालते आणि रायडिंगा अनुभव चांला होतो. सोबतच पुढे येणाऱ्या समस्या या येत नाहीत.
तुम्ही बाईकने रोज 10KM प्रवास करता का? मग किती सीसीची बाईक खरेदी करावी? अवश्य घ्या जाणून
कधी करावी पहिली सर्व्हिसिंग?
बाइकची पहिली सर्व्हिसिंग ही 500 ते 1000 किलोमीटर दरम्यान करायला हवी. प्रत्येक कंपनीचा कालवाधी थोडा वेगळा असू शकतो. यामुळे बाइक मॅन्युअली अवश्य चेक करा. योग्य वेळेवर सर्व्हिसिंग केल्याने बाइकचा परफॉर्मेंस नेहमी चांगला राहतो.
