रॉयल इनफील्डची J-सीरीज इंजिनची ही बाईक बजेटमध्ये प्रीमियम फील देते. तुम्ही सर्वात स्वस्त 350 CC बाईक खरेदी करण्याचा प्लॅन करत असला, तर Hunter 350 सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. कंपनी याला केवळ 1.37 लाख रुपयांच्या सुरुवाती एक्स शोरुम किंमतीत विकते. जी टॉप व्हेरिएंटसाठी 1.67 लाखांपर्यंत जाते. चला या कारची डिझाइन, फीचर्स, स्पेसिफिकेशन, इंजिन आणि परफॉर्मेंस डिटेल्सविषयी जाणून घेऊया.
advertisement
डिझाइन आणि फीचर्स
हंटर 350 ची डिझाइन यूथ आणि एनर्जेटिक आहे. लहान व्हीलबेस (1370 mm), 17-इंच अलॉय व्हील्स (बेसमध्ये स्पोक) आणि ट्यूबलेस टायर याला फ्लिकेबल बनवतात.
Tata Sierra तुम्ही 50 हजार रुपये सॅलरी असल्यावर खरेदी करु शकता का? पाहा कॅलक्युलेशन
रेट्रो राउंड हेडलॅम्प, टीअरड्रॉप टँक, सिंगल-पीस सीट आणि फ्लॅट हँडलबार क्लासिक लूक देतात. मेट्रो व्हेरिएंट ड्युअल-टोन रंगांमध्ये (टोकियो ब्लॅक, लंडन रेड, रिबेल ब्लू) आणि रिओ व्हाइट आणि डॅपर ग्रे सारख्या पर्यायांमध्ये येतो. 790 मिमी सीटची उंची आणि 181 किलो वजन हाताळणे सोपे करते. नवीन सस्पेंशन आणि सीट कुशनिंग लांब राईड्सवर आराम देते.
फीचर्सविषयी बोलायचं झाल्या, ही फूल एलईडी हेडलाइट, डीजी-एनालॉग क्लस्टर, ट्रिपल पॉड नेव्हिगेशन, टाइप-सी फास्ट चार्जिंग पोर्टसह खरेदी केली जाऊ शकते. तसंच बेस व्हेरिएंटमध्ये डिजिटल डिस्प्ले आणि यूएसबी मिळते. स्लिप-असिस्ट क्लच गियर शिफ्ट सोपी बनते. ड्यूअल चॅनल ABS (टॉपमध्ये) , हॅजर्ड लाइट, साइड स्टँड कट-ऑफ, नवीन सस्पेंशन आणि 160 mm ग्राउंड क्लियरेन्स स्पीड ब्रेकरवर चांगला परफॉर्म करते.
स्पेसिफिकेशन
याचे कर्ब वजन 181 kg, इंधन टाकीची क्षमता 13 लिटर, व्हीलबेस 1370 mm, ग्राउंड क्लीयरन्स 160 mm आणि सीटची उंची 790 mm आहे. फ्रंट सस्पेंशन 41mm टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रिअर ट्विन शॉक अॅब्झॉर्बर्स (6-स्टेप अॅडजस्टेबल) आहे. ब्रेकमध्ये 300 मिमी फ्रंट डिस्क, 270 मिमी रिअर डिस्क (टॉपमध्ये) आणि बेसवर ड्रम समाविष्ट आहे. टायर्स समोर 110/70-17 आणि मागील बाजूला 140/70-17 (ट्यूबलेस) आहेत. टॉप स्पीड 114-130 kmph आहे.
1 लाखांच्या डाउन पेमेंटवर WagonR खरेदी केल्यास EMI किती येईल? पाहा डिटेल्स
इंजिन आणि मायलेज
यात जे सीरीजचं 349 cc सिंगल सिलिंडर, एयर-ऑइल कूल्ड इंजिन दिलं आहे. जे 20.2 BHP पॉवर आणि 27 Nm टॉर्क प्रोड्यूस करण्यात सक्षम आहे. 5-स्पीड गियरबॉक्ससह ती स्लिप-असिस्ट क्लच मिळतो. EFI फ्यूल सिस्टम, स्मूथ पॉवर डिलिव्हरी देते. याचे ARAI क्लेम्ड मायलेज 35 KMP च्या आसपास आहे. एकूणच हंटर 350 ला स्टाइल, परफॉर्मेंस आणि व्हॅल्यू फॉर मनीच्या बेस्ट पॅकेज म्हणून खरेदी केले जाऊ शकते.
