TRENDING:

फक्त 2 लाख रुपयांत मिळेल 10 लाखांची कार! या सरकारी वेबसाइटवर मिळते अगदी स्वस्तात

Last Updated:

Govt Car Auction India: अनेकजण हे नवी कोरी कार खरेदी करण्याऐवजी सेकंड हँड कार खरेदी करणं पसंत करतात. तुम्हालाही सेकंड हँड कार खरेदी करायची असेल तर आज आपण एक भारी ऑप्शन पाहणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जे लोक सेकंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करतात. त्यांना अगदी कमी पैशांत चांगल्या कंडीशनची कार मिळावी असं वाटत असतं. तुम्हालाही असंच वाटत असेल तर एक भारी ऑप्शन आपण पाहणार आहोत. येथे 10 लाख रुपयांची कार तुम्हाला फक्त 2 लाखांमध्ये मिळू शकते. सरकारी वेबसाइटवर होणाऱ्या लिलावामुळे हे शक्य होऊ शकतं. भारतात अनेक सरकारी विभाग आणि बँका वेळोवेळी जुन्या गाड्या निलाम करतात. या गाड्या जप्त केल्या असतात किंवा मग सरकारी वापरानंतर विकल्या जातात. याच कारणामुळे कार खुप कमी किंमतीत मिळतात.
ऑटो न्यूज
ऑटो न्यूज
advertisement

या कार एवढ्या स्वस्त कशा मिळतात?

सरकारी लिलावात कार स्वस्त मिळतात कारण याचा हेतू नफा कमावणे नसतो. तर वाहन लवकर विकणे हा असतो. अनेकदा बँका लोन न फेडल्यावर गाड्या जप्त करतात. नंतर त्या लिलावात विकतात. या व्यतिरिक्त सरकारी विभागही आपल्या जुन्या गाड्या बदलण्यासाठी त्या विकतात. या सर्व कारणांमुळे कारच्या किमंती बाजारापेक्षा खुप कमी ठेवल्या जातात.

advertisement

'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त सनरुफ कार! किंमत फक्त 6.99 लाख रुपयांपासून सुरू

हा लिलाव कुठे होतो?

भारतात अनेक सरकारी वेबसाइट आणि प्लॅटफॉर्म आहेत. जिथे अशा प्रकारचा लिलाव होतो. जसं की, e-auction पोर्टल, बँकेची वेबसाइट्स आणि MSTC (Metal Scrap Trade Corporation) सारख्या सरकारी साइट्स. या वेबसाइट्सवर जाऊन तुम्ही सहज उपलब्ध कारची लिस्ट पाहू शकता. या कारसह त्याची माहिती, कंडीशन आणि बेस प्राइजही दिली जाते. ज्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यात मदत मिळते.

advertisement

खरेदीची प्रक्रिया काय आहे?

सरकारी लिलावामुळे कार खरेदी करणं थोडं वेगळं होतं. सर्वात आधी तुम्हाला संबंधित वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करावं लागतं. यानंतर तुम्हाला एक लहानशी सिक्योरिटी रक्कम जमा करावी लागते. जिला EMD म्हणतात. नंतर तुम्ही तुमच्या पसंतीच्या कारची बोली लावू शकता. जी व्यक्ती सर्वात जास्त बोली लावते. तिला ती कार मिळते. पेमेंट केल्यानंतर तुम्ही कार तुमच्या नावावर ट्रान्सफर करू शकता.

advertisement

उन्हाळ्यात अशी घ्या कार इंजिनसह टायर्सची काळजी! कधीच येणार नाही प्रॉब्लम, होईल मोठा फायदा

या गोष्टींकडे अवश्य लक्ष ठेवा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एका अखंड दगडात कोरलेलं मंदिर, दगडी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना, पुण्यातील राष्ट्रकूट वंश काळातील लेणी
सर्व पहा

स्वस्त कार खरेदी करणं चांगली संधी आहे. मात्र काही गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं. लिलावात मिळणाऱ्या कार जास्तीत जास्त “as is where is”  कंडीशनमध्ये असतात. म्हणजेच तुम्हाला ज्या स्थितीत आहेत तशा खरेदी करावा लागतात. यामुळेच कारची पूर्ण माहिती अवश्य वाचा आणि शक्य असेल तर आधी पाहून घ्या. सोबतच पेपर आणि रजिस्ट्रेशन तपासणेही गरजेचे आहे. जेणेकरुन नंतर कोणतीही अडचण येणार नाही.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
फक्त 2 लाख रुपयांत मिळेल 10 लाखांची कार! या सरकारी वेबसाइटवर मिळते अगदी स्वस्तात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल