advertisement

उन्हाळ्यात अशी घ्या कार इंजिनसह टायर्सची काळजी! कधीच येणार नाही प्रॉब्लम, होईल मोठा फायदा

Last Updated:

Car Maintenance Tips: देशभरातील अनेक ठिकाणी प्रचंड ऊन पडतंय. उन्हाळ्यात कार चालवताना काही काळजी घेणं खुप महत्त्वाचं असतं. तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी आणि कार कशी सुरक्षित ठेवावी याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

समर कार केयर
समर कार केयर
मुंबई : उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये आपण स्वतःची जशी काळजी घेतो. तशीच काळजी वाहनांचीही घ्यावी लागते. कारण उन्हाचा परिणाम हा वाहनावरही होऊ शकतो. अनेकदा लोकांना वाटतं की, कार लोखंडाची तयार केलेली असते. मग यावर उष्णतेचा परिणाम कसा होतो? पण असा विचार करणं चुकीचं आहे. उन्हाळा जसा लोकांसाठी हानिकारक असतो. तसाच तो कारसाठीही कठीण असतो. तीव्र उन्हाचा कारचं इंजिन, टायर, बॅटरी आणि एयर कंडीशनरसारख्या आवश्यक गोष्टींवर परिणाम होतो.
तुम्ही योग्य वेळी लक्ष दिलं नाही तर लहानशी चूक तुम्हाला मोठा खर्चात टाकू शकते. अशावेळी काही सावधगिरी बाळगून तुम्ही कार उन्हाळ्यात सुरक्षित ठेवू शकता. यासाठी आज आपण काही खास टिप्स जाणून घेणार आहोत.
कारच्या AC कडे लक्ष ठेवा 
उन्हाळ्यात कारची एसी किती महत्त्वाची असते, हे सर्वांनाच माहिती आहे. तुमच्या कारचा एसी कूलिंग नीट करत नसेल तर आधी सर्व्हिस करणं गरजेचं ठरतं. यामुळे ड्रायव्हिंग आरामदायक राहील आणि सिस्टमवर जास्त प्रेशर येणार नाही.
advertisement
इंजिन आणि कूलेंटकडे लक्ष कसं ठेवावं? 
उन्हाळ्यामध्ये इंजिन हे खुप लवकरच गमर होतं. यामुळे कूलेंटचा योग्य लेव्हल असणे खुप गरजेचे अते. जर कूलेंट कमी असेल तर इंजिन ओव्हरहीट होऊ शकते आणि गाडीच्या इंजनमध्ये मोठी खराब येऊ शकते. ज्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. अशावेळी या गोष्टी लक्षात ठेवणं खुप गरजेचं असतं.
advertisement
बॅटरी आणि दुसऱ्या गोष्टीं वेळो-वेळी चेक करा 
उन्हाळ्यात बॅटरी लवकर खराब होऊ शकते. कारण जास्त तापमानामुळे याचं फ्यूल कमी होतं. यासोबतच इंजिन ऑइल, वायपर आणि फिल्टरही वेळोवेळी चेक करत राहा. जेणेकरुन अचानक कोणताही प्रॉब्लम येणार नाही.
advertisement
कार नेहमी सावलीत पार्क करा 
कार पार्क करताना ती नेहमी सावलीत करा. जास्त वेळ उन्हात उभी राहिल्याने कारचं इंटीरियर खुप गरम होतं आणि पेंटही खराब होऊ शकतो. अशावेळी गाडीला सावली मिळाली नाही तर सनशेडचा वापर करा. सेफ्टी लक्षात घेता तुम्ही खिडकी थोडी ओपन साडू शकता.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
उन्हाळ्यात अशी घ्या कार इंजिनसह टायर्सची काळजी! कधीच येणार नाही प्रॉब्लम, होईल मोठा फायदा
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement