फास्ट टॅग तुमच्या बँक खात्याशी जोडलेला आहे म्हणून जेव्हा तुम्ही तुमची कार विकता, तेव्हा तुम्हाला त्या वाहनाशी जोडलेला फास्ट टॅग काढून घ्यावा लागतो. कारण तो ट्रान्सफर होत नाही. फास्ट टॅग बंद करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या बँकेत जावं लागेल किंवा कस्टमर केअरशी बोलून तो बंद करावा लागेल.
advertisement
एवढेच नाही जर तुमचा फास्ट टॅग खराब झाला किंवा हरवला तर, तरीही तुम्हाला पुन्हा बँकेशी संपर्क साधावा लागेल आणि नवीन फास्ट टॅगबद्दल अर्ज करावा लागेल. पुन्हा नवीन फास्टॅग घेण्यासाठी तुम्हाला एक निश्चित शुल्क भरावे लागेल. त्यानंतर तुम्हाला बँकेकडून एक नवीन फास्टॅग मिळेल.
पण नवीन फास्ट टॅग थेट तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर येईल. जर तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असाल तर तुम्हाला फास्टॅग सोबत ठेवावा लागेल अन्यथा तुम्हाला अनेक ठिकाणी दुप्पट टोल भरावा लागू शकतो आणि तुमचा प्रवास महाग होऊ शकतो.
