तुमच्या वाहनाच्या डॅशबोर्डवर अचानक अलर्ट लाईट पडल्यास, याचा अर्थ कारची सिस्टम काहीतरी सांगत आहे. तुम्हाला गाडी चालवताना किंवा तुमची कार सुरू केल्यानंतर ड्रायव्हरच्या डिस्प्लेवर ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) अलर्ट लाईट दिसला तर तो एक धोक्याचा इशारा असू शकते आणि तुम्ही त्वरित खबरदारी घेतली पाहिजे.
बाईक रायडिंगची आवड आहे? या आहेत भारतातील जबरदस्त सस्पेंशन असणाऱ्या 5 मोटर सायकल
advertisement
ABS म्हणजे काय?
ABS हे एक सिक्योरिटी फीचर आहे जे अचानक किंवा जलद ब्रेकिंग दरम्यान चाके लॉक होण्यापासून रोखते. यामुळे ड्रायव्हरला चांगले स्टीअरिंग कंट्रोल राखण्यास मदत होते. हे स्किडिंग टाळण्यास मदत करते. एकूणच, हे फीचर अपघात टाळण्यास मदत करते.
ABS Alert लाईट म्हणजे काय?
ABS लाईट दर्शवते की, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम एकतर बंद झाली आहे किंवा सेन्सरमध्ये गंभीर बिघाड झाला आहे. तुम्हाला हा लाईट दिसला तर, विलंब न करता तुमची कार सर्व्हिस सेंटर किंवा लोकल मेकॅनिककडे घेऊन जा, जे तुम्हाला योग्य वाटेल.
तुमच्या कारच्या चावीमध्ये लपले आहेत 5 स्मार्ट फीचर्स! पाहून व्हाल हैराण
लाईट चेतावणीचे चिन्ह कसे दर्शवते?
ABS लाईट आला तर याचा अर्थ सेन्सर योग्यरित्या काम करत नाही किंवा तो खराब झाला आहे. कल्पना करा की, तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत ब्रेक लावावे लागतील. काय होऊ शकते याची कल्पना करा. या परिस्थितीमुळे अपघाताचा धोका वाढू शकतो. कारण खराब झालेल्या सेन्सरमुळे चाके जाम होऊ शकतात, ज्यामुळे कंट्रोल गमावले जाऊ शकते.
