TRENDING:

Kia मोटर्सचं जोरदार कमबॅक, एकाच SUV ने मार्केट केलं जाम, जानेवारीत विक्रीचा नवा रेकॉर्ड

Last Updated:

New Kia Seltos मार्केटमध्ये किती कमाल दाखवणार याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते. पण, या नव्या New Kia Seltos ने जानेवारी महिन्यात धमाका केला आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दक्षिण कोरियन कंपनी  Kia Indiaने भारतात अलीकडे आपली दमदार आणि स्टायलिश अशी SUV लाँच केली. New Kia Seltos चं फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्यात आलं. नवीन New Kia Seltos मार्केटमध्ये किती कमाल दाखवणार याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते. पण, या नव्या New Kia Seltos ने जानेवारी महिन्यात धमाका केला आहे.  जानेवारी 2026 मध्ये New Kia Seltos चे एकूण 27,603 युनिट्सची विक्री झाली. हा आकडा मागील वर्षीच्या जानेवारी 2025 मधील 25,025 युनिट्सच्या तुलनेत 10.3 टक्क्यांनी वाढला आहे.
News18
News18
advertisement

New Kia Seltos ही जानेवारी महिन्यात लाँच करण्यात आली होती. New Kia Seltos चा नवा लूक आणि दमदार इंजिनमुळे विक्रीचा नवा विक्रम गाठला आहे. किया मोटर्सने डिसेंबर 2025 मधील 18,659 युनिट्सपासून 47.9% मजबूत वाढ झाली आहे, जी वर्षाच्या अखेरीस आलेल्या मंदीनंतर चांगली सुधारणा आहे. या यशाचं मुख्य कारण म्हणजे New Kia Seltos.

advertisement

New Kia Seltos ही एक मिड-साइज SUV असून या सेगमेंटमध्ये तिने आपली जागा बनवली आहे.  नवीन सेल्टोसमध्ये मॉडर्न डिझाइन, प्रीमियम फीचर्स, अॅडव्हान्स इंजिन ऑप्शन आणि चांगली टेक्नोलॉजी जसं 30-इंच डॅशबोर्ड डिस्प्ले आणि ADAS सारखी फीचर्स आहेत.

Seltosसोबत Sonet चीही मागणी आहे. सेल्टोसशिवाय सोनेटही कंपनीच्या विक्रीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हे दोन्ही मॉडेल्स मिळून Kiaच्या एकूण विक्रीत मोठा वाटा आहे. सोनेटने नुकतंच 5 लाख युनिट्सच्या घरगुती विक्रीचा टप्पा पार केला आहे. Kia Indiaच्या पोर्टफोलिओमध्ये Carens, Clavis आणि Clavis EV सारखी मॉडेल्सची सुद्धा विक्री चांगली आहे.

advertisement

Kia India कडे आता देशभरात 841 टचपॉइंट्स आहेत, जे 376 शहरांमध्ये पसरले आहेत.  जानेवारी 2026ची ही विक्री ही चांगली सुरुवात आहे, जिथे Kia डबल-डिजिट वाढीचं लक्ष्य ठेवत आहे.  भारतीय ग्राहक प्रीमियम फीचर्स, चांगली बिल्ड क्वालिटी आणि आकर्षक डिझाइन असलेल्या कारना प्राधान्य देत आहेत. Kia Indiaने आपल्या रणनीतीमुळे SUV सेगमेंटमध्ये मजबूत पकड मिळवली आहे.

advertisement

10.99 लाखांपासून किंमत सुरू

Kia Seltos मध्ये 3 इंजिनचा पर्याय दिला आहे. यामध्ये 1.5 लिटर पेट्रोल, 1.5 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिनचा पर्याय आहे. ट्रान्समिशनसाठी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिकसह पर्याय आहे. Kia Seltos मध्ये स्टँडर्ड ट्रिमसह HTE, HTK, HTX आणि GTX असे ट्रिम दिले आहे. सोबतच एक खास X-Line हा व्हेरियंटही उपलब्ध आहे. नव्या ग्लोबल K3 प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. हाय-टेंसाइल स्टिल आणि मजबूत स्ट्रक्चरवर ही तयार केली आहे. Kia Seltos 2025 मध्ये 24 स्टँडर्ड सेफ्टी फिचर्स दिले आहे. यामध्ये 6 एअरबॅग, ABS, ESC, हिल स्टार्ट असिस्ट आणि रिअर ऑक्युपेंट अलर्ट दिला आहे. Kia Seltos 2026 ची किंमत 10.99 लाख रूपयांपासून (एक्‍स-शोरूम) सुरू होते.

advertisement

Kia मोटर्सची प्रतिक्रिया

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: हळदीनं मार्केट खाल्लं, डाळिंब अन् आल्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

''वर्ष २०२६ मधील प्रेरणादायी शुभारंभामधून ग्राहकांचा Kia ब्रँडवर सतत असलेला विश्वास दिसून येतो. न्‍यू-जनरेशन सेल्‍टोससाठी सकारात्‍मक प्रतिसाद, सोनेटसाठी स्थिर मागणी आणि कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस आणि कॅरेन्‍स ईव्‍हीसाठी वाढती लोकप्रियता यामधून आमच्‍या पोर्टफोलिओची क्षमता आणि बॅलेन्स करत असल्याचं दिसून येत आहे. या कामगिरीमधून वेगळं पण निर्माण केलं असून भविष्‍यासाठी आणकी दमदार आणि चांगले मॉडेल आणले जातील.' असं मत kia इंडियाच्‍या सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष अतुल सूद यांनी व्यक्त केलं.

मराठी बातम्या/ऑटो/
Kia मोटर्सचं जोरदार कमबॅक, एकाच SUV ने मार्केट केलं जाम, जानेवारीत विक्रीचा नवा रेकॉर्ड
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल