maruti suzuki fronx ही भारतात तयार झाली आहे. भारतात या कारची विक्री जोरदार आहे. लवकरच मारुती या कारचं हायब्रिड व्हर्जन आणार आहे. पण क्रॅश टेस्टमध्ये या कारला फक्त १ सेफ्टी रेटिंग मिळालं. ही रेटिंग ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या maruti suzuki fronx चं व्हेरियंट आहे. तर जपान NCAP आणि ASEAN NCAPने टेस्ट केलेल्या maruti suzuki fronx चं चार आणि पाच स्टार रेटिंग मिळाले होते.
advertisement
maruti suzuki fronx ला १ चं रेटिंग कसं?
maruti suzuki fronx ने ४ मुख्य कॅटेगरीमध्ये सुमार कामगिरी केली. अॅडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 48 टक्के, चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 40 टक्के, वल्नरेबल रोड यूजर प्रोटेक्शनमध्ये 65 टक्के आणि सेफ्टी असिस्टमध्ये 55 टक्के स्कोर मिळाला. काही टेस्टमध्ये कारची कामगिरी ठीक होती, पण एक मोठी कमतरता असल्यामुळे सेफ्टी रेटिंगवर मोठा परिणाम झाला. सर्वात मोठी समस्या फुल-विथ फ्रंटल क्रॅश असेसमेंटमध्ये दिसली. रियर सीट बेल्ट रिट्रॅक्टरमध्ये खराबीमुळे बेल्ट अचानक उघडला आणि रियर क्रॅश टेस्ट डमी थेट पुढे जाऊन फ्रंट सीटला धडकला.
लहान मुलांच्या सुरक्षेत किती रेटिंग
तर maruti suzuki fronx ला लहान मुलांच्या सेफ्टी टेस्टमध्ये फक्त 40 टक्के स्कोअर केला, यामागचे मुख्य कारण म्हणजे रियर सीट बेल्ट प्री-टेंशनर्सची कमतरता होती. ANCAPने पाहिले की फ्रंटल आणि साइड इम्पॅक्ट टेस्टमध्ये लहान मुलांच्या डमीला पुरेशी सुरक्षा मिळाली नाही. मुलांच्या डोक्याची आणि छातीची सुरक्षा कमकुवत आणि सरासरी होती, त्यामुळे अनेक टेस्टमध्ये कमी गूण मिळाले. रियर सीटसाठी ISOFIX अँकर आणि टॉप टेथर पॉइंट्स आहेत, पण सीट बेल्ट प्री-टेंशनर्स आणि चाइल्ड प्रेझेन्स डिटेक्शन सिस्टिम नसल्यामुळे स्कोअर आणखी कमी झाला.
तसंच, maruti suzuki fronx मध्ये इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टिमने पादचारी आणि सायकल चालकांसाठी बहुतेक प्रकारात चांगली कामगिरी केली आणि मोटरसायकल चालकांसाठीही परफॉर्मन्स ठीक होती. मात्र, ही सिस्टिम रिव्हर्सिंग करताना काम करत नाही, त्यामुळे काही प्रमाणात इथं रेटिंग कमी झाले.
Maruti Suzuki Fronx मध्ये फिचर्स दमदार
maruti suzuki fronx मध्ये अनेक दमदार फिचर्स दिले आहे. ड्रायव्हर असिस्टन्स, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट, इमर्जन्सी लेन कीपिंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग आणि स्पीड असिस्टन्स सिस्टिम. कार-टू-कार आणि जंक्शन AEBने चांगली कामगिरी केली आणि अपघाताची शक्यता कमी केली. या गाडीत हेड-ऑन AEBची सुविधा नाही आणि डायरेक्ट ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टिमही दिलेली नाही. सर्व सीटिंग पोजिशनसाठी सीट बेल्ट रिमाइंडर आहेत, पण रियर सेंटर सीटसाठी ऑक्युपंट डिटेक्शन नाही.
