TRENDING:

Tata Punch vs Maruti Fronx; 6 लाख रुपयांहून कमी किंमतीत कोणती SUV खरेदी करावी? घ्या जाणून

Last Updated:

2026 Tata Punch vs Maruti Fronx: नवीन पंचमध्ये अपडेटेड फ्रंट ग्रिल, नवीन LED DRLs, प्रोजेक्टर हेडलँप्स, कनेक्टेड LED टेल लँप्स आणि बोलड् एसयूव्ही क्लॅडिंग मिळते. दुसरीकडे Maruti Fronx क्रॉसओवर स्टाइलमध्ये आहे. चला जाणू नघेऊया या दोन्हीमध्ये काय फरक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 2026 Tata Punch आणि Maruti Fronx दोन्हीही भारतीय मार्केटच्या सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये खुप चांगले पर्याय आहेत. Tata Punch मध्ये नुकतेच फेसलिफ्ट अपडेट आलेय. ज्यामध्ये नवीन टर्बो इंजिन, जास्त फीचर्स आणि मजबूत सेफ्टीचा समावेश आहे. तर Maruti Fronx क्रॉसओवर स्टाइलसोबत स्पोर्टी लूक आणि चांगलं मायलेजही देते. चला याची डिझाइन, इंटीरियर, फीचर्स , सेफ्टी , इंजिन आणि परफॉर्मेंस संबंधित डिटेल्सवर नजर टाकूया.
टाटा पंच vs मारुती फ्रॉन्स
टाटा पंच vs मारुती फ्रॉन्स
advertisement

2026 Tata Punch vs Maruti Fronx: नवीन पंचमध्ये अपडेटेड फ्रंट ग्रिल, नवीन LED DRLs, प्रोजेक्टर हेडलँप्स, कनेक्टेड एलईडी टेल लँप्स आणि बोल्ड एसयूव्ही क्लॅडिंग मिळते. ती हाय ग्राउंड क्लियरेन्स (193 mm) सह टॉल-बॉय स्टांस देते. जे भारतीय रस्त्यांसाठी परफेक्ट ऑप्शन आहे. बंपर आणि व्हील आर्च मजबतू लूक देते.

दुसरीकडे Maruti Fronx क्रॉसओवर स्टाइलमध्ये आहे. लांब, स्लोपी, रुफलाइन, स्पोर्टी फ्रंट आणि रियर डिझाइनसह हे जास्त मॉडर्न आणि नव्या पीढीची दिसते. खरंत ग्राउंड क्लियरेन्स कमी  (190 mm च्या आसपास) आहे. Punch चा रोड प्रेझेंस जास्त SUV सारखा आहे. तर Fronx सारखा फील देतो. Punchची डिझाइन जास्त रग्ड आणि प्रॅक्टिकल वाटते.

advertisement

इंटीरियर (Interior)

नवीन पंचचा इंटीरियर प्रीमियम झाला आहे. यामध्ये 10.25-इंच मोठा टचस्क्रिन, 7-इंच TFT डिजिटल क्लस्टर, एम्बिएंट लायटिंग, व्हेंटिलेटेड सीट्स (काही व्हेरिएंटमध्ये), हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि चांगली मटेरियल क्वालिटी आहे. स्पेस चांगला आहे, पण रियरमध्ये हेडरुम आणि लेग रुम Fronx पेक्षा थोडा कमी वाटू शकतो. बूट स्पेस 366 लीटर आहे.

advertisement

Fronxचे इंटीरियर जासत् स्पेसियस आणि प्रीमियम फील देते. फीचर्समध्ये लांब केबिन, सुधारित मागील लेगरूम, हेड-अप डिस्प्ले (HUD) आणि थंड ग्लोव्ह बॉक्स यांचा समावेश आहे. बूट स्पेस 308 लिटर आहे, परंतु फोल्डेबल सीट्समुळे ते अधिक वापरण्यायोग्य बनते. फ्रॉन्क्सचे केबिन अधिक रिफाइंड आणि फॅमिली-फ्रेंडली वाटते.

फीचर्स

दोन्ही कार फीचर-रिच आहेत. 2026 Tata Punch मध्ये 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो/अॅपल कारप्ले, सनरुफ, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रियर AC व्हेंट्स, JBL ऑडियो, क्रूज कंट्रोल आणि व्हॉइस कमांड्स मिळतात. Maruti Fronx मध्ये हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा (टॉप व्हेरिएंट), सनरुफ, वायरलेस चार्जिंग, Arkamys साउंड सिस्टम आणि कनेक्टेड कार टेक आहे.

advertisement

सेफ्टी (Safety)

हे सहा एअरबॅग्ज, ESP, iTPMS, हिल होल्ड, 360-डिग्री कॅमेरा, 5-स्टार भारत NCAP रेटिंग (प्रौढ आणि मुलांसाठी) आणि मजबूत बॉडी स्ट्रक्चरसह स्टँडर्ड म्हणून येते. टाटाची सेफ्टी इमेज मजबूत आहे. फ्रॉन्क्सला सहा एअरबॅग्ज, ABS, EBD, ESP आणि 360-डिग्री कॅमेरा देखील मिळतो, परंतु त्याचे NCAP रेटिंग सुमारे चार स्टार आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत पंच स्पष्टपणे विनर आहे, विशेषतः फॅमिली यूझर्ससाठी.

advertisement

इंजिन आणि परफॉर्मेंस 

2026 Tata Punch 2026 मध्ये तीन इंजिन ऑप्शन आहेत. यामध्ये पहिला 1.2L NA पेट्रोल (88 PS, 115 Nm), नवीन 1.2L टर्बो पेट्रोल (120 PS, 170 Nm) आणि CNG (73 PS, मात्र AMT ऑप्शन) पर्यात आहेत. तर Fronx मध्ये 1.2L NA पेट्रोल (89-90 PS, 113 Nm), 1.0L टर्बो पेट्रोल (100 PS, 148 Nm)  आणि सीएनजी ऑप्शनही उपलब्ध आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 वर्षांपासून काम, तरुणांना रंगमंचाशी जोडतायत गिरीश, अनोखा उपक्रम काय? Video
सर्व पहा

कोण आहे बेस्ट : तुम्ही सेफ्टी, रग्ड एसयूव्ही लूक, हाय ग्राउंड क्लियरेन्स आणि पॉवरफूल टर्बो परफॉर्मेंस हवा असेल तर 2026 Tata Punch बेस्ट चॉइस आहे. विशेषतः फॅमिली आणि सेफ्टी-कॉन्शस बायर्ससाठी हा बेस्ट ऑप्शन ठरु शकतो. तुम्हाला स्पोर्टी डिझाइन, जास्त स्पेस, रिफाइंड ड्रायव्हिंग आणि चांगले मायलेज हवे असेल तर Maruti Fronx निवडा. सर्व्हिस नेटवर्क आणि रिसेल व्हॅल्यूमध्येही Maruti पुढे आहे.

मराठी बातम्या/ऑटो/
Tata Punch vs Maruti Fronx; 6 लाख रुपयांहून कमी किंमतीत कोणती SUV खरेदी करावी? घ्या जाणून
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल