TRENDING:

न्यूझीलंडमध्ये प्रशिक्षण, गावात राहणारी 22 वर्षांची तरुणी बनली पायलट, गावी परतल्यावर सांगितली 'सक्सेस' स्टोरी

Last Updated:

young girl became pilot - ग्रामीण भागातील तरुणांसोबत तरुणीसीही आता विविध क्षेत्रांमध्ये आपल्या गावाचे नाव मोठे करत आहेत. आज अशाच एका गावातील तरुणीबाबत आपण जाणून घेणार आहोत. ही तरुणी इंडिगोमध्ये पायलट झाली असून पायलट झाल्यानंतर ती पहिल्यांदाच आपल्या गावी पोहोचली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कृष्ण कुमार गौर, प्रतिनिधी
काजल सुथार
काजल सुथार
advertisement

जोधपुर - ग्रामीण भागातील तरुणांसोबत तरुणीसीही आता विविध क्षेत्रांमध्ये आपल्या गावाचे नाव मोठे करत आहेत. आज अशाच एका गावातील तरुणीबाबत आपण जाणून घेणार आहोत. ही तरुणी इंडिगोमध्ये पायलट झाली असून पायलट झाल्यानंतर ती पहिल्यांदाच आपल्या गावी पोहोचली.

काजल सुथार असे या 22 वर्षीय तरुणीचे नाव आहे. ती जोधपुरच्या बालेसर येथील तिबणा गावातील रहिवासी आहे. आपल्या गावी पोहोचल्यावर कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले. याठिकाणी तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच तिबणा गावात तिचा सत्कारही करण्यात आला. याठिकाणी अचलाराम सुथार, रमेश सुथार, लक्ष्मण सुथार, नरेन्द्र सिंह, हितेश सुथार, विनोद सुथार सह शेकडोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी तिचे अभिनंदन केले.

advertisement

काजल ही इंडिगोमध्ये पायलट बनली आहे. काजलचे वडील फताराम हे मुंबईत फर्निचर आणि मार्बलचा व्यापार करतात. तिची आई गृहिणी आहे. काजलने न्यूझीलंड येथून पायलट बनण्याचे प्रशिक्षण घेतले. काजलने बालपणापासूनच पायलट बनण्याचे स्वप्न पाहिले होते. तसेच न्यूझीलंड येथूनच प्रशिक्षण घ्यावे, अशी इच्छा तिच्या मनात होती.

लग्नात आनंदाच्या भरात गोळीबार अन् क्षणात झालं होत्याचं नव्हतं, धक्कादायक घटना

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

पायलट बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने तब्बल 12 ते 13 तास अभ्यास केला. कधी कधी अशीवेळी यायची, जेवणही ती करू शकत नव्हती. पायलट बनण्यासाठी तिने अथक परिश्रम घेतले, असे तिने सांगितले. स्वप्न पाहिल्यावर ते पूर्ण करण्यासाठी मेहनत केली तर व्यक्तीला यश नक्की मिळते, असा सल्लाही तिने तरुणाईला दिला.

मराठी बातम्या/करिअर/
न्यूझीलंडमध्ये प्रशिक्षण, गावात राहणारी 22 वर्षांची तरुणी बनली पायलट, गावी परतल्यावर सांगितली 'सक्सेस' स्टोरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल