TRENDING:

वकील झाली तरी कोर्टाची पायरी चढली नाही; अलिबागमधील 24 वर्षीय तरुणी बनली यशस्वी व्यावसायिक, VIDEO

Last Updated:

अलिबागमध्ये बामणोली या गावामध्ये एक तरुणी चॉकलेटच्या मोदकांचा आणि ड्रायफ्रूट मोदकांचा व्यवसाय करते. अ‍ॅडव्होकेट स्वरांगी टोळकर असे या तरुणीचे नाव आहे. इतर वेळेस ती हे पदार्थ बनवतेच पण गणेशोत्सवामध्ये तिने तयार केलेल्या मोदकांना अधिक मागणी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी
advertisement

अलिबाग : अनेक जण वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर मोठे वकील बनतात. मात्र, एका तरुणीने वकिलीचे शिक्षण झाल्यानंतर कुठेही नोकरी वगैरे न करता थेट आपल्या बालपणीची आवड जोपासत व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आज ही तरुणी एक यशस्वी व्यावसायिक बनली आहे. जाणून घेऊयात, 24 वर्षांच्या तरुणीची ही प्रेरणादायी कहाणी.

अलिबागमध्ये बामणोली या गावामध्ये एक तरुणी चॉकलेटच्या मोदकांचा आणि ड्रायफ्रूट मोदकांचा व्यवसाय करते. अ‍ॅडव्होकेट स्वरांगी टोळकर असे या तरुणीचे नाव आहे. इतर वेळेस ती हे पदार्थ बनवतेच पण गणेशोत्सवामध्ये तिने तयार केलेल्या मोदकांना अधिक मागणी आहे. अलिबागमध्ये तिचे चॉकलेट, मोदक हे प्रत्येक दुकानामध्ये मिळतात. वकिलीचे शिक्षण झाल्यानंतर तिने कुठेही जॉब न करता हा चॉकलेटचा व्यवसाय सुरू केला. गणपतीत तिच्या शॉपमधील साधारण 11 मोदकांचे 700 ते 800 बॉक्स विकले जातात.

advertisement

स्वरांगी ही गेल्या 5 वर्षांपासूनच केक आणि चॉकलेट बनवते. कॉलेजमध्ये असतानाच तिने चॉकलेट मोदक बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला आवड म्हणून सुरू केलेला हा व्यवसाय आता भरभराटीस पोहचला आहे. स्वरांगी गणेशोत्सवामध्ये 11 चॉकलेटच्या मोदकांचा बॉक्स 100 रुपयांना आणि 21 मोदकांचा बॉक्स 180 रुपयांना विकते. या चॉकलेटचा मोदकांना गणेशोत्सवाच्या महिन्यात तर मागणी आहेच. मात्र, इतरही दिवसात लहान मुलांसाठी पालक तिच्याकडून हे खरेदी करतात.

advertisement

Kolhapur-Pune-Kolhapur, वंदे भारतने करता येणार प्रवास, सोमवारी पंतप्रधानांच्या हस्ते दाखवला जाणार हिरवा झेंडा

'मी सुरुवातीला आवड म्हणून चॉकलेट मोदक बनवत होती. मात्र, नंतर अनेकांनी मला तुझे चॉकलेट मोदक खूप छान असतात, असे म्हणून ऑर्डर द्यायला सुरुवात केली. तेव्हा लक्षात आलं की, लोकांना नवीन काहीतरी आवडत आहे. आपल्याकडे गणपतीच्या दिवसात बाहेर मिळणारे माव्याचे मोदक चांगल्या क्वालिटीचे नसतात, हायजिनसुद्धा नसतात. म्हणूनच, लहान मोठे सगळ्यांनाच आवडतील असे चॉकलेट मोदक बनवून विकण्याचा मी निर्णय घेतला', असे स्वरांगी हिने सांगितले.

advertisement

नमो शेतकरी महासन्मान योजना : सोलापुरात इतक्या शेतकऱ्यांनी घेतला लाभ, VIDEO

अलिबागमधील 24 वर्षीय स्वरांगी गणेशोत्सवाच्या महिन्याभरात हजारोंची उलाढाल करते. महिनाभरात ती 100 किलो चॉकलेटचा चॉकलेट मोदकांसाठी वापर करते. यावरूनच तिच्या मोदकांना अलिबागमध्ये किती मोठ्या प्रमाणात मागणी असेल याचा अंदाज येतो.

मराठी बातम्या/करिअर/
वकील झाली तरी कोर्टाची पायरी चढली नाही; अलिबागमधील 24 वर्षीय तरुणी बनली यशस्वी व्यावसायिक, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल