या भरतीच्या माध्यमातून एम्समध्ये एकूण 68 पदं भरली जाणार आहेत. या पदांशी संबंधित अर्हता तुमच्याकडे असेल तर 23 फेब्रुवारीपर्यंत किंवा यापूर्वीत या पदांसाठी अर्ज करा. एम्स भरती 2024 च्या या पदांकरिता अर्ज करण्यापूर्वी पुढे नमूद केलेल्या या गोष्टी लक्षपूर्वक वाचा.
'एम्स'मध्ये या जागांवर होईल प्रतिनियुक्ती
प्राध्यापक : 24 जागा
अतिरिक्त प्राध्यापक : 14 जागा
advertisement
सहयोगी प्राध्यापक : 14 जागा
सहायक प्राध्यापक : 16 जागा
'एम्स'मध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्हता आणि वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे संबंधित अर्हता आणि वय असावं. तरच या पदासाठी अर्ज भरता येईल.
'एम्स'मध्ये निवड झाल्यावर मिळेल एवढं वेतन!
ज्या उमेदवारांची अंतिम निवड फॅकल्टी म्हणून होणार आहे, त्यांना जाहिरातीत उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या स्तरांनुसार वेतन दिलं जाईल. या संदर्भात पुढे सविस्तर माहिती दिली आहे.
प्राध्यापक – पे मॅट्रिक्स 14 ए मूळ वेतन 1,68,900 रुपयांपासून 2,20,400 रुपयांपर्यंत
अतिरिक्त प्राध्यापक - पे मॅट्रिक्स 13 ए2 मूळ वेतन 1,38,900 रुपयांपासून 2,11,400 रुपयांपर्यंत
सहयोगी प्राध्यापक - पे मॅट्रिक्स 13 ए2 मूळ वेतन 1,38,300 रुपयांपासून 2,09,200 रुपयांपर्यंत
सहायक प्राध्यापक - पे मॅट्रिक्स 12 मूळ वेतन 1,01,500 रुपयांपासून 1,67,400 रुपयांपर्यंत
अधिकृत नोटिफिकेशन वाचण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी लिंक : https://aiimsbilaspur.edu.in/recruitment
वाचा - क्या बात हैं! मिस्तरीला मिळाली 1 लाख 37 हजार पगाराची ऑफर, काय प्रतिकिया दिली...
कसा कराल अर्ज?
या पदांसाठी अर्ज करण्याकरिता 'एम्स'च्या aiimsbilaspur.edu.in या अधिकृत वेबसाइटवर जावं. ज्या ठिकाणी एम्स विलासपूर भरती 2024 असं लिहिलं असेल, त्या लिंकवर क्लिक करा.
आवश्यक तपशील भरावेत. अर्ज पूर्ण भरावा. पदांसाठी आवश्यक कागदपत्रं अपलोड करावीत. पूर्ण अर्ज भरून सबमिट करावा. भविष्यातल्या संदर्भासाठी त्याची प्रिंट काढून घ्या.
