अल्मोडा : बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. अनेक ठिकाणी दहावी आणि बारावीचे निकालही येत आहेत. मे महिन्यापर्यंत बारावीचे ठिकाणी सर्वच राज्यात जाहीर होऊन जातील. त्यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, यांची चिंता सतावत असेल.
बारावी कॉमर्सनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे याबाबत अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेऊन त्यांच्या हिताचे काही कोर्स आपण आज जाणून घेऊयात. लोकल18 च्या टीमने यासाठी सोबन सिंह जीना विद्यापीठाचे डॉ. एस. आर कौशल यांच्याशी विशे संवाद साधला.
advertisement
डॉ. एस. आर कौशल यांनी सांगितले की, कॉमर्सचे विद्यार्थी विविध क्षेत्रात जाऊन करिअरचा उत्तम पर्याय निवडू शकतात. यामध्ये बी कॉम, बीबीए, सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए अभ्यासक्रमांचा समावेश आहे. याशिवाय विद्यार्थी बँकिंग कोचिंग आणि इन्कम टॅक्सचाही अभ्यास करू शकतात.
मार्केटिंगमध्ये चांगले भविष्य -
डॉ. एस. आर. कौशल यांनी पुढे सांगितले की, आजकाल व्यापाराचे युग आहे. प्रत्येकाच्या दैनंदिन दिनचर्येत व्यापाराशी संबंधित अनेक गोष्टी असतात. या सर्व गोष्टी आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान ठेवतात. कॉमर्सच्या विद्यार्थ्याने बाजारातून वस्तू विकत घेतल्यास सर्वप्रथम तो त्याची एमआरपी पाहतो. कारण, कॉमर्स शिकत असताना मुलांना मार्केटिंगचे कौशल्य सांगितले जाते. म्हणून बारावीत कॉमर्स शाखेत प्रवेश घेतलेल्या मुलांना करिअरचा उत्तम वाव आहे. यामध्ये विद्यार्थी सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए चे कोर्सेस करू शकतात. पण ही बाब मोठ्या स्केलच्या अभ्यासक्रमांची बाब आहे.
जर आपण लहान स्तरावरचा विचार केला तर, ग्रामीण भागातील मुले कॉमर्स क्षेत्रात आपले उत्तम भविष्य घडवू शकतात. ते बीकॉम, बीबीए, मार्केटिंग या स्तरावर आपले उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. येणारा काळ मार्केटिंगच्या क्षेत्रात पुढे जाणारा आहे आणि कॉमर्सची मुले उत्कृष्ट पद्धतीने मार्केटिंग करताना दिसत असल्याने या मुलांनी त्यांच्या कौशल्याचा विकास करणं खूप गरजेचं आहे, असे ते म्हणाले.
आपली कौशल्य करा डेव्हलप -
डॉ. एस. आर. कौशल यांनी सांगितले की, भारत सरकारने स्टार्टअप योजना चालवली आहे. ही योजना कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगले व्यासपीठ आहे. कॉमर्सचे विद्यार्थी त्यांची उत्पादने कशी विकू शकतात? हे कौशल्य सोप्या पद्धतीने शिकू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
