TRENDING:

...अन् बांधकाम मजूर बनला पोलीस अधिकारी; 'अशी' आहे संतोष कुमार पटेल यांची प्रेरणदायी गोष्ट

Last Updated:

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मोठ्या झालेल्या लोकांच्या गोष्टी खूप प्रेरणादायी असतात. अशा गोष्टींमधून नव्या पिढीला प्रेरणा मिळते

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, प्रतिनिधी : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मोठ्या झालेल्या लोकांच्या गोष्टी खूप प्रेरणादायी असतात. नवीन पिढीने ठरवलंच तर त्यांना प्रेरणा शोधण्यासाठी इतरत्र जायची गरजही भासणार नाही एवढी उदाहरणं नेहमी आपल्या आजूबाजूला असतात. गरिबीशी दोन हात करत सब-डिव्हिजनल ऑफिसर पदापर्यंत पोहोचलेल्या संतोष कुमार पटेल यांचं नाव यामध्ये आवर्जून घ्यावं लागेल.
News18
News18
advertisement

सब-डिव्हिजनल ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले संतोष कुमार पटेल या पूर्वी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील घाटिगाव येथे डीएसपी अर्थात डेप्युटी सुप्रीटेंडंट ऑफ पोलीस म्हणून कार्यरत होते. त्यांचा प्रवास बराच खडतर आहे. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. आईवडील शेती आणि मोलमजुरी करत असत. त्यांचं कुटुंब एका खोलीच्या झोपडीवजा घरात राहात होतं. पावसाळ्यात हे घर गळत असे. त्यात पुस्तकंही भिजून फाटून जात असत. पण या सगळ्या अडचणींवर मात करत रात्री रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करत संतोष यांनी परिस्थिती बदलली आणि सब-डिव्हिजनल ऑफिसरपदापर्यंत मजल मारली.

advertisement

आजही ते जुने दिवस संतोष विसरलेले नाहीत. सरकारकडून मिळणारं थोडंफार रेशन आणि घरच्या शेतात पिकणारं थोडंफार धान्य यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. कधी डाळ आहे तर भात नाही आणि भात आहे तर डाळ नाही अशीही परिस्थिती अनेकदा असे. मात्र, यातल्या कशानेही संतोष खचून गेले नाहीत. घर चालवण्यासाठी आईवडील करत असलेले काबाडकष्ट बघून त्यांनी आईवडिलांना मदत करायचं ठरवलं. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी संतोष लहानपणापासूनच मोलमजुरी करु लागले. कधी ते बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करत तर कधी तेंदूपत्ता विकायला जात. अभ्यास करुन नोकरी मिळवायची असेल तर मेहनतीला पर्याय नाही, शिक्षण आणि नोकरी याच गोष्टींच्या बळावर आपण गरिबीतून वर येऊ शकतो, हे खूप लहान वयातच त्यांनी ओळखलं होतं.

advertisement

कठीण परिस्थितीवर मात करत अभ्यास करुन संतोष शालान्त परीक्षेत जिल्ह्यात पहिले आले. त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह ग्रामस्थांनाही त्यांचा अभिमान वाटला. पैसे नसल्यामुळे पुढचं शिक्षण घेता येणार नाही अशी परिस्थिती आली तरी संतोष यांनी आपल्या हिमतीवर शिक्षण सुरु ठेवलं. त्यांनी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यात उत्तम गुण मिळवत ते पोलीस अधिकारी झाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर आपल्या समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न त्यांनी कधीही सोडला नाही. लहानपणापासून अनुभवलेली गरिबी आणि प्रतिकूलता यांचं स्मरण ठेवून त्यांनी बैतूलमध्ये दारुबंदी अभियान राबवलं. आपल्या कामातून सतत समाजाला दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पोलिसांबद्दल समाजात असलेले गैरसमज बदलून पोलिसांची प्रतिमा उजळवण्याची त्यांना इच्छा आहे. माणसाला इच्छा असेल तर कोणत्याही कठोर परिस्थितीवर मात करुन तो यशस्वी होऊ शकतो हे संतोष यांच्या उदाहरणावरुन सिद्ध होतं.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
...अन् बांधकाम मजूर बनला पोलीस अधिकारी; 'अशी' आहे संतोष कुमार पटेल यांची प्रेरणदायी गोष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल