संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओ या संस्थेच्या हैदराबादमधल्या अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लॅबोरेटरीने (एएसएल) ग्रॅज्युएट, टेक्निशियन (डिप्लोमा) आणि ट्रेड (आयटीआय) अॅपरांटिस पदासाठी ऑफलाइन स्वरूपात अर्ज मागवले आहेत. ही भरती एक वर्ष कालावधीकरिता असेल. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत यासाठीचे अर्ज पाठवायचे आहेत. इच्छुक उमेदवार www.drdo.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज डाउनलोड करू शकतात.
advertisement
या भरतीविषयी अधिक माहिती जाणून घेऊ या. एकूण 90 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. त्यांपैकी ग्रॅज्युएट अॅपरांटिस पदं 15 असून, टेक्निशियन (डिप्लोमा) अॅपरांटिस पदं 10 आहेत. ट्रेड (आयटीआय) अॅपरांटिस पदं 65 आहेत.
पात्रता : ग्रॅज्युएट अॅपरांटिस आणि टेक्निशियन अॅपरांटिस (डिप्लोमा) या पदांकरिता पात्र ठरण्यासाठी उमेदवार नॅशनल अॅपरांटिसशिप ट्रेनिंग स्कीमच्या (NATS) nats.education.gov.in या वेबसाइटवर अर्ज करू शकतात. ट्रेड अॅपरांटिस (आयटीआय) पदाकरिता पात्र ठरण्यासाठी उमेदवारांनी नॅशनल अॅपरांटिसशिप प्रमोशन स्कीमच्या (NAPS) apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करणं बंधनकारक आहे. नोंदणी न केलेल्या उमेदवारांचे अर्ज फेटाळले जातील. आपापल्या कोर्सेसमध्ये 2021, 2022, 2023 साली पास झालेले उमेदवारच अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नये.
इच्छुक उमेदवारांनी ठरलेल्या फॉरमॅटमध्ये भरलेला अर्ज पाकीटबंद करून रजिस्टर्ड किंवा स्पीड पोस्टाने पाठवावा. पाकिटावर APPLICATION FOR APPRENTICESHIP TRAINING AT ASL असा उल्लेख करावा.
वाचा - क्या बात हैं! मिस्तरीला मिळाली 1 लाख 37 हजार पगाराची ऑफर, काय प्रतिकिया दिली...
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : डायरेक्टर, अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लॅबोरेटरी, कांचनबाग पीओ, हैदराबाद - 500058
अर्ज करण्यासाठी आधी drdo.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावं. होमपेजवर 'करिअर्स'वर क्लिक करावं. पीडीएफ बटणावर क्लिक करून 'Engagement Of Graduate, Technician And Trade Apprentices In Asl, Hyderabad' हा अर्ज डाउनलोड करून घ्यावा. डाउनलोड केलेला अर्ज प्रिंट करावा आणि योग्य तपशील भरावेत. आवश्यक ती कागदपत्रं जोडून फॉर्म वर दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टने पाठवावा.
अधिकृत नोटिफिकेशनची लिंक : https://www.drdo.gov.in/drdo/sites/default/files/career-vacancy-documents/advtApprASL21022024.pdf