TRENDING:

इच्छा नसताना कोरोनाकाळात सोडलं पुणे, पण अमरावतीमध्ये वाजवला डंका, मैथिलीनं विद्यापीठात मिळवले 2 gold medal

Last Updated:

यासोबतच आणखी एक महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या दोन महिन्यांपूर्वीच मी मोबाईल सोडला. म्हणजे परीक्षेच्या दोन महिने आधी कोणत्याच सोशल मीडियाचा वापर बंद केला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
खुशालकांत दुसाने, प्रतिनिधी
मैथिली फुले सुवर्णपदकाने सन्मानित
मैथिली फुले सुवर्णपदकाने सन्मानित
advertisement

अमरावती : अनेकांचे पुण्यात शिकण्याचे स्वप्न असते. मात्र, काही वेळा ते पूर्ण होत नाही. त्यामुळे काही जण निराश होतात. कोरोनासारख्या अचानक उद्भवलेल्या महासंकटामुळे 2021 मध्ये अमरावती येथील मैथिली फुले हिला पुणे शहर सोडावं लागले होते. त्यावेळी तिलाही वाईट वाटले होते. मात्र, तिने त्या प्रसंगावरही मात करत तब्बल 2 सुवर्णपदक जिंकले आहेत.

advertisement

नुकताच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 40वा पदवीप्रदान समारंभ पार पडला. यामध्ये अमरावतीच्या मैथिलीने तब्बल 2 सुवर्ण पदके जिंकली आहे. मैथिली किशोर फुले असे या तरुणीचे नाव आहे. तिला एमए इंग्रजी (साहित्य) या विषयामध्ये मफतलाल वाडीलाल नाईक सुवर्णपदक आणि डॉ. चित्तरंजन यांच्याकडून दिले जाणारे टागोर सेमिनार सुवर्णपदक अशी दोन सुवर्णपदके मिळाली आहेत. यूजीसीचे व्हाइस चेअरमन प्राध्यापक दीपक कुमार श्रीवास्तव आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीचे कुलगुरू डॉ. मिलिंद बऱ्हाटे यांच्या उपस्थितीत तिला सन्मानित करण्यात आले.

advertisement

कोरोनाकाळात सोडलं पुणे -

न्यूज18 लोकलसोबत बोलताना तिने सांगितले की, तिचे पदवीचे शिक्षण हे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. यानंतर तिला पुढचे शिक्षण हे तिथेच करायचे होते. मात्र, 2021 कोरोनाकाळात तिला पुणे शहर सोडावे लागले आणि अमरावतीला परत यावे लागले. त्यामुळे ती निराश झाली होती. यावेळी तिच्या आईवडिलांनी तिला प्रेरणा दिली की तुथे इथे चांगल्या पद्धतीने अभ्यास करुन टॉपर येऊन दाखव. त्यामुळे मग आई वडिलांनी दिलेले आव्हान तिने स्विकारले आणि शेवटी एमए इंग्रजी (साहित्य) या विषयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे दोन सुवर्णपदके मिळवून दाखवले.

advertisement

सुवर्णपदक विजेती विद्यार्थिनी मैथिली फुले

पेटंट म्हणजे काय, पेटंट कशासाठी मिळू शकतं, ते कुठे व कसं रजिस्टर करावं, सर्व माहिती एका क्लिकवर...

परीक्षेच्या तयारीबाबत बोलताना ती म्हणाली की, मी वाचन केल्यानंतर व्यवस्थित प्रकारे नोट्स काढल्या. यासोबतच आणखी एक महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या दोन महिन्यांपूर्वीच मी मोबाईल सोडला. म्हणजे परीक्षेच्या दोन महिने आधी कोणत्याच सोशल मीडियाचा वापर बंद केला आणि हा नियम मी एमएच्या चारही सेमेस्टरमध्ये फॉलो केला. तसेच तिने सांगितले की, चौथ्या सेमेस्टरदरम्यान तिला मायग्रेनचा त्रासही झाला. पण तिने त्या त्रासातही अभ्यासाठी कोणत्याही प्रकारे तडजोड न करता मन लावून प्रामाणिकपणे अभ्यास केला. याचेच फळ म्हणजे अमरावती विद्यापीठात प्रथम येत आज दोन सुवर्णपदके मिळवली.

advertisement

भविष्यात काय करण्याचे स्वप्न?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

सध्या ती सेट आणि नेट परीक्षेची तयारी करत असून तिला भविष्यात प्राध्यापक व्हायचे असल्याचे तिचे स्वप्न आहे. यासोबतच कायदा विषयातही तिची रुची असून ती भविष्यात लॉ मध्ये शिक्षण घेणार असल्याचे म्हणाली. मैथिली फुले हिचे वडील डॉ. किशोर फुले हे निवृत्त प्राध्यापक आहेत. तसेच अमरावती विद्यापीठाचे माजी जनसंपर्क अधिकारी आहेत. तिच्या या यशात तिच्या आईवडिलांचा मोठा सहभाग असल्याचे तिने यावेळी न्यूज18 लोकलसोबत बोलताना सांगितले.

मराठी बातम्या/करिअर/
इच्छा नसताना कोरोनाकाळात सोडलं पुणे, पण अमरावतीमध्ये वाजवला डंका, मैथिलीनं विद्यापीठात मिळवले 2 gold medal
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल