लखनऊ : आजही अनेकांचा ओढा हा नोकरीकडे असल्याचा पाहायला मिळतो. मात्र, एकीकडे जेव्हा अनेक जण चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना एक महिला अशी आहे, जिने अमेरिकेतून शिक्षण घेतल्यानंतरही लाखो रुपयांची नोकरी न करण्याचा निर्णय घेतला.
प्रियम चंद्रा असे या महिलेचे नाव आहे. प्रियम यांनी लाखो रुपयांची नोकरी न करता आपल्या आजोबांची कला पुढे घेऊन जाण्याचा निर्णय केला. आता त्यांच्या अनोखी आणि सुंदर पेंटिंग सुमारे 1 ते 1.5 लाख रुपयांना विकली जात आहेत. लोकांनाही हे पेंटिंग खूप आवडत आहेत.
advertisement
उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध चित्रकार सुखवीर सिंघल वॉश पेंटिंगसाठी प्रसिद्ध होते. त्यांची चित्रे बहुतेक अध्यात्मिक आणि भारतीय परंपरांवर आधारित होती. यामुळेच ही अनोखी चित्रे नामशेष होऊ दिली जाऊ शकत नाहीत, म्हणूनच प्रियमने हे पाऊल उचलले आहे.
रवींद्रालयात पुस्तक मेळा सुरू आहे. या पुस्तक मेळाव्यात प्रियमने आपल्या आजोबांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे पाहण्यासाठी लोक दूरवरून येत आहेत आणि ते खूप पसंतही करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या पेंटिंगमध्ये सून पहिल्यांदा घरी आल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. याशिवाय अर्जुनला धनुर्विद्या शिकतानाही दाखवण्यात आले आहे आणि त्यासोबतच रामायणातील अशी अनेक दृश्ये पेंटिंगमध्ये दाखवण्यात आली आहेत जी अतिशय आकर्षक आणि सुंदर आहेत.
18 मार्चला शनिचा उदय, या राशींवर कोसळणार दु:खाचे डोंगर, तुमची रास तर यामध्ये नाही ना?
लोकल18 च्या टीमने प्रियम यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, त्या अमेरिकेत शिकल्या होत्या आणि अमेरिकन एक्सप्रेसमध्ये नोकरी करत होत्या. याठिकाणी त्यांना लाखो रुपयांचे पॅकेज मिळाले होते. मात्र, त्यांचे आजोबा वॉश पेंटिंग करायचे आणि ती पेंटिंग खूप सुंदर असायची. प्रत्येकाला तशी चित्रे काढणे शक्य नव्हते. कारण यामध्ये पेंटिंग प्रथम रंगीत करून पाण्यात बुडवून नंतर सुंदर फिनिशिंग केले जाते, त्यामुळे ही पेंटिंग खूप महाग आहेत.
त्या पुढे म्हणाल्या की, त्यांना त्यांच्या आजोबांच्या वॉश पेंटिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची इच्छा आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या आजोबांना सर्वजण ओळखतात. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना या चित्रकलेची लोकांना ओळख करून द्यायची आहे आणि येणाऱ्या पिढीला हे चित्र कसे बनवले जाते, हे शिकवण्याचाही प्रयत्न सुरू आहे.