TRENDING:

20 वेळा अपयश तरी हरला नाही पठ्ठ्या! आज 500 कोटींचा मालक

Last Updated:

एका गरीब शेतकऱ्याच्या मुलानं स्वप्न पाहिलं आणि संघर्ष करत बनला 500 कोटींचा मालक, प्रत्येकानं वाचावी अशी त्याच्या यशाची संघर्षाची कहाणी

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: व्यवसायाची पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला स्वत:चा व्यवसाय उभा करण्यात असंख्य अडचणी येतात. त्यामुळे काहीजण हा प्रयत्न अर्ध्यातूनच सोडून देतात. पण, काहीजण प्रचंड आशावादी असतात. अशा व्यक्तींना, आपल्या कष्टाच्या आणि चिकाटीच्या बळावर यश मिळते. विकास डी. नाहर यांचा अशाच व्यक्तींमध्ये समावेश होतो. त्यांना 20 वेळा अपयश आलं तरी त्यांनी माघार घेतली नाही. 10 हजार रुपयांची गुंतवणूक करून नाहर यांनी सुरू केलेल्या कंपनीचं मूल्य सध्या 500 कोटी रुपये आहे. विकास नाहर हे प्रसिद्ध स्नॅक्स कंपनी असलेल्या 'हॅप्पिलो'चे को-फाउंडर आणि सीईओ आहेत.
संघर्षाची कहाणी
संघर्षाची कहाणी
advertisement

विकास यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. मात्र, त्यांना नेहमी व्यवसायात रस होता. बेंगळुरू युनिव्हर्सिटीतून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतल्यानंतर ते जैन ग्रुपमध्ये वरिष्ठ आयात व्यवस्थापक म्हणून रुजू झाले. पुढे एमबीए करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून एमबीए केलं. त्यानंतर ते सात्विक स्पेशालिटी फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक झाले. या ठिकाणी काम केल्याने त्यांना चांगला अनुभव आला. हॅप्पिलो सुरू करताना त्यांना या अनुभवाचा फायदा झाला.

advertisement

2015 मध्ये विकास यांनी सात्विक स्पेशालिटी फूड्समधील नोकरी सोडली आणि 2016 मध्ये हॅप्पिलोची स्थापना केली. ही कंपनी हेल्दी स्नॅक्स बनवते. सध्या हॅप्पिलो 40 प्रकारची ड्रायफ्रूट्स विकते. याशिवाय कंपनी 60 प्रकारचे मसाले आणि 100 प्रकारची चॉकलेट्स देखील विकते. यामुळे कंपनीचं मार्केटमध्ये चांगलं वर्चस्व आहे. स्वत:चा व्यवसाय सुरू करताना विकास यांना संघर्ष करावा लागला. 10 हजार रुपयांपासून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता आणि मदतीला फक्त दोन कर्मचारी होते. सध्या कंपनीचं मूल्य 10 हजार रुपयांवरून अंदाजे 500 कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे. हॅप्पिलोची उत्पादनं देशभरातील अनेक ई-कॉमर्स साइट्स आणि रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

विकास यांच्या मते, अपयशातून धडा घेऊन पुढे जाणं, हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आपलं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्यांसाठी विकास नाहर यांची गोष्ट प्रेरणादायी आहे. जर तुमच्यात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता, हे विकास यांनी दाखवून दिलं आहे.

मराठी बातम्या/करिअर/
20 वेळा अपयश तरी हरला नाही पठ्ठ्या! आज 500 कोटींचा मालक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल