जमशेदपुर : अनेकदा काही स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र, तरीही न खचता काही जण पुन्हा आपला पुढचा प्रवास मेहनतीने, कष्टाने आणि जिद्दीने करत राहतात आणि यशस्वी होतात. आज अशाच एका तरुणाच्या जिद्दीची आणि यशाची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
अविनाश कुमार असे या तरुणाचे नाव आहे. त्याची सीडीएस परीक्षेत निवड झाली आहे. त्याने ऑल इंडिया रँक 56 मिळवत स्वत:ला सिद्ध केले. त्याचा हा चौथा प्रयत्न होता. याआधी त्याने एनडीएचीही परीक्षा दिली होती. मात्र, ग्रुप डिस्कशनमध्ये त्याची निवड होऊ शकली नाही. फक्त 23 वर्षांचा असेलला अविनाश आता ट्रेनिंगनंतर सैन्यदलात लेफ्टनंट होणार आहे.
advertisement
लठ्ठपणापासून ते हाय ब्लडप्रेशरपर्यंत, फूल एक फायदे अनेक, 22 आजारांवर फायदेशीर
अविनाश हा झारखंडच्या जमशेदपुर येथील रहिवासी आहे. लोकल18 शी बोलताना त्याने सांगितले की, तो एका अत्यंत सामान्य कुटुंबातून येतो. त्याचे वडील रामा कृष्ण एका खासगी कंपनीत काम करतात तर आई ब्यूटी पार्लरच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत. अविनाशने दहावीचे शिक्षण राजेंद्र विद्यालयात घेतले आणि 94.4 टक्के गुण मिळवत तो उत्तीर्ण झाला. तर बारावीच्या परीक्षेतही त्याने डीएवी बिष्टुपुर येथून 94.4 टक्के गुण मिळवले. यानंतर तो दिल्लीतील हिंदू कॉलेज याठिकाणी पदवीच्या शिक्षणासाठी गेला.
अविनाशने सांगितले की, वडिलांच्या सांगण्यावरुन त्याने NDA ची परीक्षेची तयारी केली. लेखी परीक्षा पास झाल्यावर मात्र, त्याला ग्रुप डिस्कशनमध्ये अपयश आले. त्याने एसएसबी अलाहाबादमध्ये 5 दिवस राहिल्यावर ते दिवस त्याच्या आयुष्यातील अत्यंत प्रेरणादायी असे राहिले. येथूनच त्याला सैन्यदलात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर मग त्याने कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिस (CDS) या परिक्षेची तयारी सुरू केली आणि कोणत्याही कोचिंगविना त्याने हे यश मिळवले. 5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देतात. यामधून फक्त 150 विद्यार्थ्यांची तयारी होते.
तरुणाईला दिला हा मोलाचा सल्ला -
अविनाश हा आता भारतीय सैन्यदलात रुजू होण्यापूर्वी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमी येथे 18 महिन्याचे ट्रेनिंग करेल. त्यानंतर त्याची लेफ्टनंट पदावर नियुक्ती केली जाईल. अविनाशने तरुणाईला सल्ला देताना म्हटले की, तुम्हाला ज्या विषयात आवड असेल तेच करावे. आई वडिलांना समजावून सांगावे तसेच त्यांना विश्वास द्यावा की तुम्ही करू शकतात. सोशल मीडियाचा चांगला, सकारात्मक पद्धतीने वापर करावा, असेही त्याने सांगितले.
