एडीएमध्ये सल्लागार पदाच्या एकूण 25 जागा निघाल्या आहेत. या पदांसाठी तुम्ही येत्या 31 मार्चपर्यंत अर्ज करू शकता. या पदामध्ये तांत्रिक कामासंबंधी 16 जागा तर बिगरतांत्रिक कामसाठी 9 जागा अशा एकूण 25 जागांवर भरती होणार आहे. तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर संस्थेकडून त्या पदासाठी जी योग्यता देण्यात आली आहे, ती सर्व पात्रता तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. एडीएच्या अधिकृत वेबसाईटवर पात्रतेसबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
advertisement
या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाहीये, पात्र उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. या पदासाठीची मुलाखत बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तुम्ही एडीएमध्ये सल्लागार पदासाठी अर्ज केल्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया जसे मुलाखतीची तारीख, सिलेक्शन झाल्यास पुढील प्रक्रिया संस्थेतर्फे तुम्हाला इमेल किवां पोस्ट ऑफीसमध्ये अधिकृत पत्र पाठवून कळवण्यात येईल.