उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 11 जुलै 2024 देण्यात आली आहे. याचाच अर्थ 11 जुलैपर्यंत येणारे अर्ज हे भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. भरती प्रक्रियेसाठी नेमकी पात्रता काय आहे? कोणाला अर्ज करता येईल? भरती प्रक्रिया कशी होणार आहे? नियुक्ती झाल्यानंतर उमेदवारांना किती पगार देण्यात येईल, याबाबत जाणून घेऊ.
उमेदवाराचं वय किती असावं?
advertisement
ऑइल इंडिया कंपनीत केमिस्ट या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय किमान 24 वर्षं आणि कमाल 40 वर्षं असावं. वयोमर्यादेबाबत कंपनीने अधिक माहिती त्यांच्या वेबसाइटवर दिली आहे.
कोण अर्ज करू शकेल?
केमिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून रसायनशास्त्र (केमिस्ट्री) विषयात किमान दोन वर्षं कालावधीची पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर डिग्री उत्तीर्ण केलेली असावी. तसंच उमेदवाराला औद्योगिक किंवा संस्था किंवा संशोधन प्रयोगशाळेत किमान एक वर्ष कामाचा अनुभव असावा. उमेदवारानं हा अनुभव त्याची मास्टर डिग्री पूर्ण झाल्यानंतर घेतलेला असावा.
किती मिळेल पगार?
ऑइल इंडिया कंपनीच्या भरती प्रक्रियेद्वारे केमिस्ट पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला प्रति महिना 70 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
अशी होईल निवड
ऑइल इंडिया भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाईल. अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर पात्र उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी ऑइल इंडिया लिमिटेड, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर एनर्जी स्टडीज, पाचवा मजला, एनआरएल सेंटर, 122ए ख्रिश्चन वस्ती, जी. एस. रोड, गुवाहाटी, आसाम इथे बोलावण्यात येणार आहे. इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांनी प्रत्यक्ष हजर राहणं गरजेचं आहे. इंटरव्ह्यूद्वारे उमेदवारांची नोकरीसाठी अंतिम निवड करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही ऑइल इंडिया कंपनीची अधिकृत वेबसाइट oil-india.com यावर भेट देऊ शकता.
