मधेपुरा : प्रयत्न करणाऱ्यांना एक दिवस यश नक्कीच मिळते, असे म्हटले जाते. त्यामुळे अनेक जण प्रयत्न करतातही आणि यशही मिळवतात. आज अशाच एका तरुणाची आपण कहाणी जाणून घेऊयात. बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील मुरहो येथील एका व्यक्तीने हे सिद्ध केले आहे. त्याची ही कहाणी वाचल्यावर तुम्हाला प्रेरणा नक्कीच मिळेल.
विकास ऋषीदेव असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने प्रयत्न केले. मेहनत केली आणि आज त्यांना यशही मिळाले. एकेकाळी आर्थिक परिस्थिती अत्यंत साधारण असल्याने भांडी धुण्याचे काम करणारा आणि इतर लोकांच्या घराची साफसफाईचे काम करणाऱ्या विकास यांनी केंद्र सरकारची नोकरी मिळवली आहे.
advertisement
त्यांनी सतत अभ्यास सुरू ठेवला आणि आधी रेल्वेच्या ग्रुप डीमध्ये यश मिलवले. यानंतर काही वर्षांनी लोको पायलटची परीक्षा पास केल्यावर संबलपुर येथे रुजू केले. सध्या ते बिहारच्या सहरसा जिल्ह्यात पोस्टेड आहेत. समाजातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही व्यक्ती आज महत्त्वाची प्रेरणास्त्रोत आहे.
विकास ऋषि देव यांच्या वडिलांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे त्यांचे आईवडील आपल्या मुलांना शिकवू शकले नाही. दरम्यान, उपचारांअभावी अवेळी दोघांचा मृत्यूही झाला. मात्र, तरीसुद्धा विकास यांनी हिंमत न हारता अभ्यास सुरू ठेवला. आता विकास यांच्या कुटुंबात दोन भाऊ आणि आजी आहे.
मंडल आयोगाचे अध्यक्ष बीपी मंडल ज्या गावाचे आहेत, त्याच गावातून विकास येतात. मुरहो येथे एक महादलित वस्ती आहे. तेथे राहणारे विकास हे रेल्वेत लोको पायलट बनले आहेत. लोकल18 सोबत बोलताना ते खूप भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
ते म्हणाले, मुरहो गावाला संपूर्ण देश ओळखतो. समाजवादाचे राजकारण करणाऱ्या लोकांसाठी हे कोणत्याही तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही.
400 विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये देतोय शिक्षण, राज्यपालांनीही केला सन्मान, कोण आहे हा अवलिया?
प्रत्येक वर्षी याठिकाणी राजकीय कार्यक्रम होतात. मात्र, गावातील दलित वस्तीतील लोकांची परिस्थिती स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही बदलली नाही. पैशाच्या अभावाने लोक आपल्या मुलांना शिकवण्याऐवजी दिल्ली-पंजाब येथे मजूरी करण्यासाठी पाठवतात.
तो दिवस आला -
माझ्या आई-वडिलांचे निधन 2003 मध्ये झाले. यानंतर मी आयुष्यात काहीतरी करुन दाखवायचे असा निर्णय घेतला, कारण त्या परिस्थितीतून बाहेर निघायचे होते. यासाठी काहीही करावे लागले तरी मी त्यासाठी तयार होतो. मी दहावीनंतर बारावीचे शिक्षण हे मधेपुरा येथून पूर्ण केले. त्यावेळी माझा खर्च निघावा म्हणून मी एका उद्योगपतीच्या घरी भांडे धुण्याचे तसेच झाडू मारण्याचे काम केले. बारावीच्या परीक्षेसोबत मी रेल्वेच्या परीक्षेची तयारी केली. यानंतर तो दिवस आला. 2007 मध्ये मी परीक्षा पास झालो आणि माझे आयुष्यच बदलले, असे ते म्हणाले. आता ते लोको पायलट असून सध्या बीपीएससीच्या मुख्य परीक्षेची तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
