TRENDING:

Success Story : महिलेच्या स्वप्नानं इतरांनाही दिलं बळ, व्यवसाय सुरू करत गृहिणी बनली मसाला क्वीन

Last Updated:

एका छोट्याशा गावात राहणाऱ्या वैशाली घाडीगावकरांचा प्रवास इतर अनेक महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सिंधुदुर्ग, 21 नोव्हेंबर : नोकरीच नव्हे तर आजच्या काळात व्यवसायातही महिला पुरुषांच्या बरोबरीने आपलं वेगळं अस्तित्त्व सिद्ध करताना दिसत आहे. अनेक महिलांनी शहरामध्ये, तसेच मोठमोठ्या ठिकाणी विविध प्रकारचे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यातून त्या चांगली कमाई करताना दिसत आहेत. मात्र, आज आपण एका अशा महिलेची कथा जाणून घेणार आहोत, ज्या महिलेनं गावातच मसाल्याचा व्यवसाय सुरू केला. इतकंच नव्हे तर त्यांनी गावातील पाच मुलींनाही आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार दिला आहे.
वैशाली घाडीगावकर
वैशाली घाडीगावकर
advertisement

वैशाली घाडीगावकर असे या महिलेचे नाव आहे. त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील नांदोसे या छोट्याशा गावात राहतात. वैशाली यांना स्वयंपाकाची विशेष आवड आहे. त्यामुळे त्या स्वयंपाकाला भाजीसाठी लागणारे वाटण तसेच मसाले स्वत: घरीच तयार करायच्या. यावेळी त्यांच्या घरी येणारे नातेवाईक तसेच मैत्रिणींनी त्यांच्या या मसाल्याची स्तुती केली. इतकेच नव्हे तर त्यांनी युवा परिवर्तन या संस्थेच्या माध्यमातून मसाले बनवण्याच्या कोर्सविषयी अधिक माहिती मिळाली. त्यांना मसाले बनवणे तसेच स्वयंपाकाची विशेष आवड असल्याने त्यांनी मसाला बनवायचे तब्बल 27 प्रकार शिकून घेतले.

advertisement

यानंतर वैशाली घाडीगावकर यांनी आता शिवम मसाले नावाने स्वत:चा उद्योग सुरू केला. विशेष म्हणजे त्यांनी कुठेही मोठ्या शहरात न जाता आपल्या गावातच हा मसाल्याचा उद्योग सुरू केला. गेल्या अनेक दिवसांपासून त्या यशस्वीपणे हा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या या उद्योगाच्या माध्यमातून गावातील तब्बल 5 मुलींना रोजगारही मिळाला आहे.

काय म्हणाल्या वैशाली घाडीगावकर -

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंब आणि आल्याला काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

आपल्या या उद्योगाबाबत वैशाली घाडीगावकर म्हणाल्या की, ''आधी मी घरच्या घरी मसाले बनवायचे. आता माझ्या आवडीचे रुपांतर उद्योगात झाले आहे. यामुळे मी आता कुटुंबालाही आर्थिकरित्या मदत करू शकते असून या उद्योगाच्या माध्यमातून गावातील इतरांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे''. आपल्या मेहनतीच्या आणि इच्छाशक्तीच्या बळावर एक गृहिणी ते शिवम मसाल्याच्या यशस्वी उद्योजिका असा वैशाली घाडीगावकर यांचा प्रवास सुरू आहे. एका छोट्याशा गावात राहणाऱ्या वैशाली घाडीगावकरांचा प्रवास इतर अनेक महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
Success Story : महिलेच्या स्वप्नानं इतरांनाही दिलं बळ, व्यवसाय सुरू करत गृहिणी बनली मसाला क्वीन
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल