TRENDING:

APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?

Last Updated:

APMC Market: महाराष्ट्रातील कृषी मार्केटमध्ये शनिवारी मोठ्या घडामोडी राहिल्या. प्रमुख शेती पिकांच्या दरांबाबत जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: महाराष्ट्रातील विविध कृषी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीमालाची आवक होते. सध्या मध्यपूर्वेतील तणाव आणि बदलत्या हवामानामुळे बाजारात मोठे उलटफेर दिसत आहेत. आज शनिवार, 21 मार्च रोजी विविध कृषी मालांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यांच्या दरांमध्ये चढउतार पाहायला मिळाले. कांदा, द्राक्षे, केळी आणि लिंबूच्या दरांबाबत अपडेट जाणून घेऊ.
advertisement

कांद्याला किती मिळाला दर?

राज्याच्या मार्केटमध्ये आज 18 हजार 949 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. गेल्या पाच दिवसांतील ही आजची सर्वात कमी आवक ठरली. यापैकी 8 हजार 931 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 300 ते 1127 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 530 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 1050 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

advertisement

Weather Alert: 24 तासांत वारं फिरलं, महाराष्ट्रावर पुन्हा दुहेरी संकट, हवामान विभागाकडून अलर्ट

लिंबूला भाव

राज्याच्या मार्केटमध्ये आज 394 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 331 क्विंटल लिंबूस 2500 ते 3500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल लिंबूस 10000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

advertisement

द्राक्षाचे दर

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 872 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 778 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 12000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.

केळीची आवक 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

राज्याच्या मार्केटमध्ये केळीला चांगला उठाव मिळतोय. मात्र सरासरीच्या तुलनेत केळीची आवक कमीच आहे. आज केवळ 328 क्विंटल केळीची आवक झाली. नाशिक बाजारात आवक झालेल्या 210 क्विंटल केळीस प्रतीनुसार 800 ते 1800 रुपये दरम्यान सर्वात कमी बाजार भाव मिळाला. अवकाळी पावसाचा आणि युद्धाचा केळी पिकास फटका बसल्याचे उत्पादक सांगत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल