advertisement

APMC Market: लिंबाचे दर तेजीत, द्राक्षानं मार्केट खाल्लं, कांदा अन् केळीचे दर काय?

Last Updated:

APMC Market: महाराष्ट्रातील कृषी मार्केटमध्ये 20 मार्च रोजी कांदा, केळी, लिंबू आणि द्राक्षांच्या दरांबाबत अपडेट जाणून घेऊ.

+
APMC

APMC Market: लिंबूचे दर तेजीत, द्राक्षानं मार्केट खाल्लं, कांदा अन् केळीचे दर काय?

सांगली: महाराष्ट्रातील विविध कृषी मार्केटमध्ये दररोज शेतीमालाची आवक आणि उलाढाल मोठ्या प्रमाणात होते. सध्या मध्यपूर्वेत इराण-इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम देखील काही प्रमाणात कृषी मालावर होत आहे. शुक्रवारी, 20 मार्च 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
कांद्याचे आजचे दर
राज्याच्या मार्केटमध्ये 2 लाख 15 हजार 116 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख 02 हजार 198 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 299 ते 1977 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 50 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 2270 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
लिंबूचे दर तेजीत
राज्याच्या मार्केटमध्ये आज 773 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 370 क्विंटल लिंबूस 2500 ते 3500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल लिंबूस 14000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
द्राक्षाचे दर काय?
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1496 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 704 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 12000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
केळीला 3500 पर्यंत भाव
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 361 क्विंटल केळीची आवक झाली. पुणे बाजारात आवक झालेल्या 108 क्विंटल केळीस प्रतीनुसार 1250 ते 3500 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: लिंबाचे दर तेजीत, द्राक्षानं मार्केट खाल्लं, कांदा अन् केळीचे दर काय?
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement