या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी काही अटी आहेत. या कॉलेजमध्ये एकूण 130 जागा आहेत. ज्यामध्ये 105 जागा या मुलांसाठी तर 25 जागा या मुलींसाठी आहेत. या महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला नीट परीक्षा पास होणं गरजेचं आहे. सोबतच तुमच्याकडे भारत, नेपाळ किंवा भूटान या तीन देशांपैकी एका देशाचं नागरिकत्व आवश्यक आहे. तुम्ही अविवाहीत असणं गरजेचं आहे, तुमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तुम्हाला लग्नाची परवानगी मिळत नाही. तसेच सैन्य दलात भरती होण्यासाठी जे काही फिटनेस संदर्भात नियम बनवण्यात आले आहेत. त्या सर्व नियमांची पूर्तता होणं गरजेचं आहे.
advertisement
तुम्हाला जर या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्ही विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा उतीर्ण होणं गरजेचं आहे. इंग्रजी, फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय अनिर्वाय आहेत. हे सर्व विषय मिळून तुम्हाला जर बारावीत साठ टक्क्यांपेक्षा अधिक गूण असतील तरच तुम्हाला या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. या सोबतच इंग्रजी विषयात कमीत कमी पन्नास टक्के गुण आवश्यक आहेत.