TRENDING:

भारत मातेच्या सुपूत्राची अभिमानास्पद कामगिरी, आता मिळाला हा सन्मान, कोण आहेत सलीम खान?

Last Updated:

एजाज नबी यांनी सांगितले की, सलीम यांची पहिली पोस्टिंग 2017 मध्ये मेरठ बटालियन आठ ग्रेनेडियरमध्ये झाली होती. त्यांचे आजोबा गुलाम कादर खान, मोठे काका गुलाम मुस्ताक खान, लहान काका आरिफ खान यांनीसुद्धा भारतीय सैन्यदलात सेवा बजावली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रविन्द्र कुमार, प्रतिनिधी
सलीम खान यांचा सन्मान
सलीम खान यांचा सन्मान
advertisement

झुंझुनूं : भारतीय सैन्यदलातील जवान हे भारताचा गर्व आहेत. त्यांच्या कामगिरीने भारतातील जनतेचा ऊर भरुन येतो. यातच आता भारतीय सैन्यदलातील एका जवानाने अशी कामगिरी केली ज्यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल.

सलीम खान असे या भारतीय जवानाचे नाव आहे. त्यांना त्यांच्या वीरतेसाठी सेना मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील नुआ येथील रहिवासी असलेले सलीम खान यांनी शौर्य आणि धैर्याने शत्रू देशांपासून भारताचे रक्षण करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

advertisement

प्रयागराजमधील नॉर्दन कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंदर कुमार यांनी सलीम यांचे वडील अझाझनबी, आई नझमा बानो आणि पत्नी झोफिया नाझ यांच्या उपस्थितीत बारामुल्ला काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दोन कुख्यात दहशतवाद्यांना ठार केल्याबद्दल ग्रेनेडियर सैनिक सलीम खान यांना सेना पदक प्रदान करत सन्मान केला.

'एसटीची वारी लय भारी'! 50 टक्के सवलतीचा फायदा, अन् वर्षभरात 55 कोटी महिलांचा प्रवास, पण ST ला काय मिळालं?

advertisement

29 राष्ट्रीय रायफल्समध्ये पोस्टिंग असताना सलीम यांना सप्टेंबर 2022 मध्ये कोर्डन आणि शोध मोहिमेवर पाठवण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपला जीव धोक्यात घालून दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यासाठी भारतीय लष्कराने त्यांचा सेना पदक देऊन गौरव केला आहे. सलीम यांनी आतापर्यंत सहा ऑपरेशन्समध्ये सहभाग नोंदवला असून 13 दहशतवाद्यांना ठार केले आहे.

advertisement

कुटुंबाची पार्श्वभूमी सैन्यदलाची -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी खर्चात होईल जास्त कमाई, हिवाळ्यात घ्या ही भाजीपाला पिके, Video
सर्व पहा

एजाज नबी यांनी सांगितले की, सलीम यांची पहिली पोस्टिंग 2017 मध्ये मेरठ बटालियन आठ ग्रेनेडियरमध्ये झाली होती. त्यांचे आजोबा गुलाम कादर खान, मोठे काका गुलाम मुस्ताक खान, लहान काका आरिफ खान यांनीसुद्धा भारतीय सैन्यदलात सेवा बजावली आहे. सलीम यांचे भाऊ हवालदार अजहर खानहेसुद्धा जम्मू काश्मिरमध्ये तैनात आहेत. सलीम यांना सेना मेडल मिळाल्यानंतर गावातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
भारत मातेच्या सुपूत्राची अभिमानास्पद कामगिरी, आता मिळाला हा सन्मान, कोण आहेत सलीम खान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल