गोड्डा : भारतामध्ये काही गावं अजूनही शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येते. काही गावात तर एकही सरकारी अधिकारी दिसून येत नाही. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या आणि प्रेरणादायी गावाची कहाणी सांगणार आहोत. हे गाव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. कारण यामागे कारणही खास आहे.
या गावातील प्रत्येक घरातील एक जण सरकारी सेवेत नोकरी करत आहे. या गावातून न्यायाधीश, आयएएस, बँक अधिकारी, डॉक्टर, इंजीनिअर, रेल्वे सेवा, पोस्ट विभाग, शिक्षकाची नोकरीसह प्रत्येक विभागात गावातील नागरिक सेवा बजावत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडलाच, असेल की हे अनोखं गाव आहे तरी कोणते? तर हे गाव भारतातील झारखंड या राज्यात आहे.
advertisement
गोड्डा जिल्ह्यातील मोतिया हे गाव संपूर्ण जिल्हाच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे. शिक्षणाच्या बाबत हे गाव अत्यंत जागरूक असल्याचे दिसून आले आहे. या गावातील प्रत्येक घरातील एक जण सरकारी नोकरीत आहे. या गावातील सरकारी सेवेत असणारे हे लोक घराबाहेरच असतात.
दोन्ही पायांनी दिव्यांग पण तरीही हजारो लोकांचा वाचवला जीव, तरुणीच्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट
गावाची लोकसंख्या किती -
गावाचे प्रमुख अशोक चौधरी यांनी सांगितले की, या गावातील 70 टक्के लोकसंख्या ही ब्राह्मण परिवार आहे, जे एकाच चौधरी कुटुंबाचे लोक आहेत. जर संपूर्ण गावाच्या लोकसंख्येचा विचार केला असता 1 हजार घरांमध्ये 6 हजार लोकसंख्या आहे. ब्राह्मण परिवारासोबतच इतर जातीचेही लोक सरकारी नोकरीत आहेत.
आधी डॉक्टर, मग नंतर आयएएस बनले -
या गावात 1954 मध्ये माध्यमिक शाळा तयार झाली. यामध्ये शिक्षण घेऊन सर्वात आधी राधाकांत चौधरी हे डॉक्टर बनले. यानंतर सुशील कुमार चौधरी हे आयएएस अधिकारी बनले. यानंतर गावात सरकारी नोकरीची परंपरा सुरू झाली. एकमेकांना पाहून प्रभावित होऊन गावातील लोकं सरकारी नोकरीची तयारी करू लागले आणि सरकारी नोकरीत रूजू झाले. सद्यस्थितीत याच गावाचे सुपूत्र हिमांशु शेखर चौधरी रांची येथील झारखंड अन्न आयोगाचे अध्यक्ष म्हणून सेवा बजावत आहेत.
गावात किती शाळा -
या गावात सध्या एक शासकीय माध्यमिक शाळा आहे. यामध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले जाते. एक शासकीय उच्च माध्यमिक शाळा आहे. या शाळेत नववी ते दहावीचे वर्ग चालवले जातात. तर बारावीपर्यंतही हायस्कूल आहे, ज्यामध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. इतकेच नव्हे तर 4 अंगणवाडी केंद्र असून एक रुग्णालयही आहे.
