TRENDING:

स्टेट बँकेत नोकरीची संधी, 61,000,00 रुपये मिळणार पॅकेज; कुठे करायचा अर्ज पाहा

Last Updated:

भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयने देशभरातील ब्रँचेससाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रोजगार हा सध्या आपल्या देशातील सुशिक्षितांसमोरील अत्यंत चिंतेचा विषय ठरत आहे. काही मोजक्या जागांवरील भरतीसाठी लाखो अर्ज येण्याच्या बातम्या आपण अनेकदा वाचत किंवा बघत असतो. त्यावरुन नोकऱ्यांची उपलब्धता आणि बेरोजगारांची संख्या यातील व्यस्त प्रमाण सहज स्पष्ट होतं. अशा वेळी चांगल्या नोकऱ्यांबाबत माहिती गरजूंपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं ठरतं. भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयने देशभरातील ब्रँचेससाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
SBI
SBI
advertisement

एसबीआयकडून देशभरातील विविध ब्रँचेससाठी 1040 स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (एसओ) पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. 18 जुलै 2024 ला एसबीआयने काढलेल्या नोटिफिकेशनमधून पात्र उमेदवारांनी 8 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज पाठवावेत असं आवाहन केलं आहे. सेंट्रल रिसर्च टीम, प्रॉडक्ट लीड, रिलेशनशिप मॅनेजर, व्हीपी वेल्थ, इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्ट अशा अनेक पदांसाठीही ही भरती होणार आहे.

advertisement

या भरतीबाबत अधिक माहितीसाठी sbi.co.in या वेबसाइटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एसबीआयची कार्यक्षमता अधिक प्रबळ करणं हे या भरतीचं प्रमुख उद्दिष्ट आहे. बँकिंगसंबंधी विविध विषयांतील सक्षम उमेदवारांना ही संधी उपयुक्त ठरु शकते. त्यामुळेच भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेतील प्रतिष्ठेच्या पदांवर काम करण्याची संधी हवी असेल तर दिलेल्या मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी तुम्ही भरलेली सर्व माहिती योग्य आहे याची खात्री करा. भविष्यातील गरजेसाठी अर्ज आणि शुल्क भरल्याची रिसीट या दोन्हीची एक प्रत जवळ बाळगा. या पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींना सुमारे 61 लाख रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेजेस मिळू शकतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

एसबीआयमध्ये सेंट्रल रिसर्च टीममध्ये प्रॉडक्ट लीड आणि सपोर्टमध्ये प्रत्येकी दोन जागा आहेत. प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर पदावर टेक्नॉलॉजी आणि बिझनेसमध्ये अनुक्रमे एक आणि दोन जागा आहेत. रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी 273 जागा आहेत. व्हीपी वेल्थ पदासाठी 643 तर रिलेशनशिप मॅनेजर टीम लीडच्या 32 जागा आहेत. रिजनल हेड पदासाठी सहा, इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्ट पदासाठी 30 तर इन्व्हेस्टमेंट ऑफिसर पदासाठी 49 जागांवर अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी वेबसाइटवरील माहिती वाचून विहित नमुन्यात आठ ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करणं अपेक्षित आहे.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
स्टेट बँकेत नोकरीची संधी, 61,000,00 रुपये मिळणार पॅकेज; कुठे करायचा अर्ज पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल