बोकारो : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे अनेकांचा वेळ हा सोशल मीडियामध्ये वापरला जात आहे. मात्र, एका तरुणाने तब्बल 2 वर्षांपूर्वीच सोशल मीडिया सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. तब्बल 12 तास दररोज अभ्यास केला आणि या मेहनतीचं फळ म्हणजे त्याचा JEE Advanced या परिक्षेत देशात 466 वा क्रमांक आला आहे.
advertisement
रविवारी JEE Advanced या परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये बोकारो के एरस पब्लिस स्कूलच्या विद्यार्थ्याने मोठे यश मिळवले आहे. अभिज्ञान असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. रविवारी अत्यंत चांगली कामगिरी करत त्याने देशात 466 वी रँक मिळवली. त्याने फिजिक्समध्ये 97, मॅथमध्ये 72, केमिस्ट्रीमध्ये 91 गुण मिळवले. तसेच या आधी जेईई मेन्समध्ये त्याने 99.93 इतके गुण मिळवले होते.
photos : महिला सरपंचाची कमाल, गावात सुरू केल्या अशा सुविधा की गावकरीही म्हणताय, वाह!
अभिज्ञान हा कोडरमा येथील रहिवासी आहे. त्याची आई स्मिता सिन्हा त्याला घेऊन बोकारो येथील ऑपरेटिव्ह कॉलनीत 2022 पासून राहत आहेत. त्याच्या या यशानंतर त्याने लोकल18 शी बोलताना सांगितले की, तो आपल्या या यशाने आनंदी आहे. त्याने यासाठी दररोज तब्बल 12 तास अभ्यास केला. तसेच 2 वर्षांपासून सोशल मीडियापासून अंतर ठेवले होते. कधीही कमी गुण मिळाले म्हणून निराश होऊ नये. तर स्वत:वर आत्मविश्वास ठेवून दुप्पट मेहनत करायला हवी. यामुळे नक्की यश मिळते. परिक्षेच्या वेळी शांतचित्ताने पेपर द्यावा, असा सल्लाही त्याने दिला.
अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरुन 16 करावं, तेव्हाच थांबतील गुन्हे, JJB चे माजी सदस्य नेमकं काय म्हणाले?
मुलाने पूर्ण केले स्वप्न -
अभिज्ञानने आपल्या यशाचे श्रेय त्याचे आई-वडील, आजी-आजोबा आणि शाळेतील शिक्षकांना दिले आहे. त्याचे वडील सुनील कुमार सिन्हा हे सीडी गर्ल्स हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत आणि आई स्मिता या सुद्धा आधी शिक्षिका होत्या. मात्र, आता त्या गृहिणी आहेत. आपल्या मुलाच्या कामगिरीवर खूप आनंदी आहेत. अभिज्ञानने संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले आहे, अशा भावना त्याचे वडील सुनील कुमार यांनी व्यक्त केल्या.
