SSC निकाल 2024 महाराष्ट्र बोर्डाचा आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 10th निकाल 2024 आज, 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करेल. हा निकाल विद्यार्थी आणि पालक ऑनलाईन mahresult.nic.in पाहू शकता आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल 2024 पाहता येईल. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज म्हणजेच 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.
advertisement
विभागनिहाय निकाल
कोकण विभागीय मंडळाची बाजी ९९.०१
सर्वात कमी निकाल नागपूर- ९४.७३ टक्के
विद्यार्थिनी- 97.21
विद्यार्थी निकाल- 94.56
72 पैकी 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे
कुठे पाहता येईल निकाल
Maharashtra SSC Result 2024 तुम्ही ऑनलाईन निकाल पाहू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवरुन जाऊन तिथे माहिती अपडेट करायची आहे. विद्यार्थ्याचे सर्व डिटेल्स भरल्यानंतर निकाल पाहता येणार आहे.
1- mahresult.nic.in
2- mahahsscboard.in
3- results.digilocker.gov.in
4- results.gov.in
