आयआयटी दिल्लीमधून बीटेक डिग्री घेतल्यावर रुची यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं व मॅकेन्झीसारख्या मल्टिनॅशनल कंपनीत आठ वर्षं काम केलं. यानंतर जेव्हा रुची यांनी स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा पती आशिष यांनी पूर्ण पाठिंबा दिला. यानंतर रुची यांना गुंतवणूकदाराची गरज होती. त्यांनी आपली कल्पना कागदावर उतरवली आणि एक बिझनेस प्लॅन तयार केला. आपली बिझनेस आयडिया घेऊन रुची यांनी अनेक गुंतवणूकदारांच्या भेटी घेतल्या; पण सर्वांनीच ही आयडिया चांगली नसल्याचं सांगून नकार दिला; पण रुची यांचा स्वतःवर विश्वास होता आणि त्या फक्त गुंतवणूकदाराच्या शोधात होत्या.
advertisement
73 जणांना भेटल्यावर सापडला गुंतवणूकदार
रुची यांनी 73 जणांना आपली बिझनेस आयडिया ऐकवली; पण सर्वांनी नकार दिला. त्यानंतर त्यांना एक गुंतवणूकदार सापडला. 2015मध्ये त्यांनी बीटूबी प्लॅटफॉर्म ऑफ बिझनेस (Of Business) नावाने एक स्टार्टअप कंपनी सुरू केली. हा प्लॅटफॉर्म इंडस्ट्रीजना कच्चा माल पुरवतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की फक्त नऊ वर्षांत या कंपनीचं व्हॅल्यूएशन 44 हजार कोटींवर पोहोचलं आहे.
पुन्हा उभारली आणखी एक कंपनी
एका स्टार्टअपच्या यशानंतर रुची यांनी 2017मध्ये ऑक्सिझो फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची दुसरी स्टार्टअप कंपनी सुरू केली. हा प्लॅटफॉर्म त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून कच्चा माल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फायनान्शिअल सर्व्हिसेस पुरवतो. या स्टार्टअपने नुकतंच 200 कोटी डॉलरचं फंडिंग उभारलं. या कंपनीचं व्हॅल्युएशन अंदाजे 8,300 कोटी रुपये आहे. अशा प्रकारे त्यांच्या दोन्ही स्टार्टअप कंपन्या आज युनिकॉर्न झाल्या आहेत.
आज 2,600 कोटी रुपयांची नेटवर्थ
सद्यस्थितीत रुची कालरा यांच्या दोन्ही कंपन्यांची मार्केट व्हॅल्यू 52 हजार कोटी रुपये आहे. एवढंच नाही, तर रुची यांची नेटवर्थदेखील 2022मध्येच 2,600 कोटी रुपयांवर पोहोचली होती. 2021मध्ये त्यांच्या कंपनीचा रेव्हेन्यू 197 कोटी रुपये होता. तो 2022मध्ये वाढून 313 कोटी रुपयांवर पोहोचला. तुमचा स्वतःवर विश्वास असेल आणि तुम्हाला आयुष्यात काय करायचं हे ठरवलं असेल तर कोणतंही ध्येय सहज गाठता येतं, हे रुची यांच्या यशावरून दिसून येतं.
