रिक्त पदांचा घेतला आढावा
प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व शहर पोलिस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिस आयुक्तालयाकडून रिक्त पदांचा आढावा मागितला आहे. 2024 पर्यंत रिक्त झालेल्या पदांची यादी मागवण्यात आली आहे. या पोलिस भरतीची सराव चाचणी ही पावसाळ्याआधी करण्याचे नियोजन आहे.
मागील भरतीसाठी 18 लाख अर्ज
advertisement
मागच्यावेळी राज्यात 17 हजार पदांची भरती झाली. त्यासाठी राज्यभरातून तब्बल 18 लाख अर्ज आले होते. यावेळी देखील अशीच परिस्थिती राहील या पद्धतीने भरतीचे नियोजन करण्यात येणार आहे.
लवकर भरती प्रक्रिया सुरू केली जाणार
प्रशिक्षण व खास पथकाचे अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, ''रिक्त पदांची माहिती मागवली आहे. त्यानुसार लवकरच भरती केली जाणार आहे. रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली आहे. सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल''.