TRENDING:

तब्बल 8 वेळा अपयश, शेवटी नवव्या प्रयत्नात मात केलीच! डॉक्टरची प्रेरणादायी गोष्ट, म्हणाले...

Last Updated:

ते म्हणाले, ‘मी नशीबवान नव्हतो, गरीब आणि सामान्य कुटुंबातील असल्याने माझे शिक्षण ग्रामीण स्तरावरून सुरू झाले. माझा रूम पार्टनर एकाच प्रयत्नात यशस्वी झाला. पण मला सलग अनेक वेळा अपयश आले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सनन्दन उपाध्याय, प्रतिनिधी
डॉ. संतोष कुमार सिंह
डॉ. संतोष कुमार सिंह
advertisement

बलिया : अनेकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यातील काही जण हे खचतात आणि आहे ती परिस्थिती स्विकारुन त्याप्रमाणे आयुष्य जगतात. मात्र, काही जण असे असतात ज्यांना आपली परिस्थिती बदलायची असते, आणि त्यासाठी ते कठोर परिश्रम घेतात आणि एक दिवस आपल्या कठोर परिश्रम, सातत्य आणि संयमाच्या बळावर यश मिळवतात. अशाच एका व्यक्तीची कहाणी आपण आज जाणून घेऊयात.

advertisement

डॉ. संतोष कुमार सिंह असे या व्यक्तीचे नाव आहे. ते म्हणाले, ‘मी नशीबवान नव्हतो, गरीब आणि सामान्य कुटुंबातील असल्याने माझे शिक्षण ग्रामीण स्तरावरून सुरू झाले. माझा रूम पार्टनर एकाच प्रयत्नात यशस्वी झाला. पण मला सलग अनेक वेळा अपयश आले. मात्र, तरीही हिंमत न हारता नवव्या प्रयत्नात मोठे यश संपादन केले. माझ्या शिक्षणासाठी माझ्या वडिलांनीच नाही तर माझ्या आईनेही आयुष्यभर खासगी कंपन्यांमध्ये कष्ट घेतले आणि शेवटी मी त्यांचे स्वप्न साकार केले’.

advertisement

बलिया जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी (Emergency medical Officer) डॉ. संतोषकुमार सिंग यांची ही कहाणी आहे. त्यांनी सांगितले की, माझ्या आई-वडिलांनी मला शिक्षण देण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि मी अनेकदा अपयशी ठरलो. पण मी हिंमत हारलो नाही आणि नवव्या प्रयत्नात पीएमटी पास करत यश मिळवले आणि आज मी या रुग्णांची सेवा करत आहे.

advertisement

inspiring story : बापाचं छत्र हरवलं, जागा नसल्याने बाथरुममध्ये अभ्यास; पण उजमानं करुन दाखवलं!

त्यांनी सांगितले की, घरची परिस्थिती साधारण असल्याने मी आठवीनंतर जिल्ह्याच्या ठिकाणी आले. त्याठिकाणी दहावीचे शिक्षण घेतल्यानंतर नालंदा कॉलेज येथून बारावीचे शिक्षण घेतले. यानंतर दरभंगा कॉलेज बिहार येथून 2012 मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर मी पटना येथे निघून गेलो. तसेच तिथे पीएमटीची तयारी करू लागलो.

advertisement

कितव्या प्रयत्नात मिळालं यश -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी खर्चात होईल जास्त कमाई, हिवाळ्यात घ्या ही भाजीपाला पिके, Video
सर्व पहा

डॉ. संतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, मी खोली घेऊन पीएमटी (PMT) ची तयारी करत होतो. माझा रुम पार्टनर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला. पण मला त्यासाठी आठ वेळा अपयश मिळाले. शेवटी पुन्हा एका प्रयत्न करत आई वडिलांच्या आशीर्वादाने मी हिम्मत न हारता प्रयत्न केले आणि नवव्या प्रयत्नात मी पीएमटीची परीक्षा 1857 रँक मिळवत पास केली. यानंतर 2014 मध्ये जिल्हा रुग्णालय बलिया याठिकाणी रुजू झाले. दिल्लीत दोन रुग्णालयात एक-एक वर्ष GRSIP देखील केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा प्रवास हा तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

मराठी बातम्या/करिअर/
तब्बल 8 वेळा अपयश, शेवटी नवव्या प्रयत्नात मात केलीच! डॉक्टरची प्रेरणादायी गोष्ट, म्हणाले...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल