पदसंख्या
महाराष्ट्र – 91
मुंबई मेट्रो – 16
नवी दिल्ली – 68
पाटणा – 50
तिरुवनंतपुरम – 52
अहमदाबाद – 124
अमरावती – 77
बेंगळुरू – 49
भोपाळ – 70
भुवनेश्वर – 50
चंदीगड – 96
चेन्नई – 88
गुवाहाटी – 66
हैदराबाद – 79
जयपूर – 56
कोलकाता – 63
advertisement
लखनऊ – 99
पात्रता काय आहे?
अर्ज करणारा उमेदवार बँकेतून ६० वर्षांचे पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्त झालेला असावा.
जर कोणी स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेतली असेल, राजीनामा दिला असेल, निलंबित झाला असेल किंवा बँक सोडली असेल तर तो पात्र मानला जाणार नाही.
SBI किंवा त्याच्या पूर्वीच्या सहयोगी बँकांमधून MMGS-III, SMGS-IV/V आणि TEGS-VI या पदांवरून सेवानिवृत्त अधिकारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया कशी?
शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत या दोन टप्प्यांत निवड केली जाईल.
SBI एक शॉर्टलिस्टिंग कमिटी स्थापन करेल, जी अर्जदारांच्या पात्रतेचे निकष ठरवेल.
मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना बोलावले जाईल. मुलाखत १०० गुणांची असेल.
अंतिम निवड फक्त मुलाखतीत मिळवलेल्या गुणांच्या आधारे करण्यात येईल. जर एकाहून अधिक उमेदवारांना समान गुण मिळाले, तर वयोमानाच्या उतरत्या क्रमाने गुणवत्ता यादीत त्यांना स्थान दिले जाईल.
अर्ज कसा करायचा?
अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर लॉगिन करा.
समवर्ती लेखापरीक्षक भरतीचा विभाग शोधा.
आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज भरा.
अर्ज अंतिम सबमिट करण्याआधी सर्व माहिती तपासा.
