TRENDING:

‘ती’च्यासाठी अशक्य काहीच नाही! लहानपणी क्रिकेटची आवड, लग्नानंतर केलं असं, आता घरात 100 ट्रॉफी, Video

Last Updated:

Womens Day 2026: गेल्या आठ वर्षांत त्यांनी 250 हून अधिक सामने खेळले असून 100 पेक्षा अधिक ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवत आहेत. राजकारण, समाजकारण, शिक्षण यांसोबतच क्रीडा क्षेत्रातही महिलांची उल्लेखनीय कामगिरी दिसून येते. पुण्यातील रस्ता पेठ परिसरात राहणाऱ्या रुपल बाफना यांनी घरची जबाबदारी सांभाळत क्रिकेटच्या मैदानावरही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या आठ वर्षांत त्यांनी 250 हून अधिक सामने खेळले असून 100 पेक्षा अधिक ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत. त्यांचा हाच प्रवास लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement

रुपल बाफना यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्यांचे माहेर नारायणगाव येथे असून त्या एकत्र कुटुंबात वाढल्या. घरात भावा सोबत खेळताना त्यांची क्रिकेटची आवड अधिक वाढत गेली. मात्र त्या काळात मुलींनी क्रिकेट खेळण्यास फारसे प्रोत्साहन देणारे वातावरण नव्हते. तरीही त्यांनी आपली आवड जपली.

लग्नानंतरही त्यांची क्रीडाक्षेत्राशी नाळ कायम राहिली. साधडी गावात आयोजित करण्यात आलेल्या ‘स्पोर्ट्स डे’ मध्ये त्यांनी 400 मीटर आणि 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आणि पहिला क्रमांक पटकावला. त्यावेळी आयुष्यातील पहिली ट्रॉफी मिळाली. या ट्रॉफीने आयुष्यात नवा आत्मविश्वास निर्माण केला आणि त्यानंतर क्रिकेट खेळण्याचा निर्णय अधिक ठाम केला, असे रुपल सांगतात.

advertisement

कामावर जायला उशीर झाला अन् आयुष्य बदललं! शेतमजूर महिला झाली उद्योजक, आता लाखात उलाढाल!

View More

एका मैत्रिणीने रुपल यांना जैन सोशल ग्रुपमध्ये महिला क्रिकेट सामने आयोजित केले जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी जैन सोशल प्लॅटिनियम ग्रुपमध्ये सहभाग घेतला आणि पहिल्यांदाच अधिकृत क्रिकेट सामना खेळला. विशेष म्हणजे पहिल्याच सामन्यात त्यांना बक्षीस मिळाले. याच क्षणापासून त्यांच्या क्रिकेट प्रवासाची खरी सुरुवात झाली.

advertisement

गेल्या आठ वर्षांत रुपल बाफना यांनी तब्बल 250 हून अधिक सामने खेळले आहेत. या कालावधीत त्यांनी 100 पेक्षा जास्त ट्रॉफी जिंकल्या आहेत. तसेच त्यांनी दोन आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. पुणे, मुंबई, कोलकाता आणि राजस्थान अशा विविध शहरांमध्ये जाऊन त्यांनी क्रिकेट सामने खेळले आहेत.

घरची जबाबदारी सांभाळत क्रिकेट खेळणे सोपे नव्हते. मात्र त्यांच्या कुटुंबाने त्यांना मोठा आधार दिला. त्यांच्या सासूबाईंचा आवडता खेळ क्रिकेट असल्यामुळे त्यांनी रुपल यांना नेहमी प्रोत्साहन दिले. तसेच मुलांची जबाबदारी सांभाळण्यात त्यांच्या पतीनेही त्यांना चांगली साथ दिली. त्यामुळे घर आणि क्रिकेट यामध्ये समतोल राखत आपला प्रवास यशस्वीपणे सुरू ठेवला.

advertisement

रुपल बाफना सांगतात की, आपल्याला आवडणारा खेळ खेळायला मिळतो, हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. कुटुंबाचा पाठिंबा असल्यामुळे मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. माझी मुलेही मला नेहमी प्रोत्साहन देतात. त्यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांचा स्वभाव खूप शिस्तप्रिय होता. ते नारायणगावचे सरपंच होते. त्यामुळे घरात शिस्तीचे वातावरण होते. मात्र त्यांनी आपली आवड जपत धाडसाने प्रयत्न केले आणि त्यातूनच आज त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशक्य काहीच नाही! लहानपणी क्रिकेटची आवड, तिनं लग्नानंतर केलं असं, घरात 100 ट्रॉफ
सर्व पहा

आज अनेक महिला त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहेत. घरकाम, कुटुंब आणि आवड यामध्ये योग्य समतोल साधत रुपल बाफना यांनी क्रिकेट क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांचा हा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
‘ती’च्यासाठी अशक्य काहीच नाही! लहानपणी क्रिकेटची आवड, लग्नानंतर केलं असं, आता घरात 100 ट्रॉफी, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल