पुण्यात 2 अल्पवयीन मुलींना घरात बोलवलं, व्हिडिओ दाखवले, मग दार बंद करून धक्कादायक कृत्य, आरोपीला आता घडली अद्दल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आरोपी जाधव याने दोन अल्पवयीन मुलींना आपल्या घरी बोलावलं. तिथे त्यांना मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा विकृत प्रकार केला.
पुणे : अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४० वर्षीय नराधमाला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. 'पॉक्सो' (POCSO) विशेष न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. कुंडलिक गुलाबराव जाधव (रा. महंमदवाडी, हडपसर) असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
नेमकी घटना काय?
ही धक्कादायक घटना २७ ऑगस्ट २०२० रोजी हडपसर परिसरात घडली होती. आरोपी जाधव याने दोन अल्पवयीन मुलींना आपल्या घरी बोलावलं. तिथे त्यांना मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा विकृत प्रकार केला. त्यानंतर, एका मुलीला घराबाहेर काढून त्याने दार आतून बंद केलं आणि दुसऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलींनी घरी माहिती दिल्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी वकील मिलिंद दातरंगे आणि मुस्कान संस्थेचे ॲड. गौरव जाचक यांनी १४ साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित मुलगी, तिची आई आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष निर्णायक ठरली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ती मान्य करत जाधव याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच, दंडाची रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
advertisement
या निकालामुळे अशा विकृत प्रवृत्तींना मोठा चाप बसला असून, पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 10:56 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात 2 अल्पवयीन मुलींना घरात बोलवलं, व्हिडिओ दाखवले, मग दार बंद करून धक्कादायक कृत्य, आरोपीला आता घडली अद्दल






